Share

“या” दोन अभिनेत्रींनी केला किसिंग सीन; वेब सिरीजची सर्वत्र चर्चा

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा: श्रुती सेठ ही एक लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री आहे आणि अभिनेत्रीने आता ओटीटीच्या जगात प्रवेश केला आहे. श्रुती लवकरच ‘ब्लडी ब्रदर्स’ या वेब सीरिजमध्ये दिसणार आहे. यामध्ये श्रुतीसोबत अभिनेत्री मुग्धा गोडसेही दिसणार आहे. श्रुती आणि मुग्धाची ही वेब सिरीज लवकरच Zee5 वर प्रसारित होणार आहे. ही वेब सिरीज प्रदर्शित होण्याआधीच प्रेक्षकांमध्ये चर्चेचा विषय बनली आहे. याचे कारण आहे या वेब सिरीजमधला श्रुती आणि मुग्धाचा किसिंग सीन. होय, या वेब सिरीजमध्ये मुग्धा आणि श्रुतीने किसिंग सीन केले आहेत.

नुकतीच श्रुतीने एक मुलाखत दिली आहे, ज्यामध्ये ती तिच्या ‘ब्लडी ब्रदर्स’ या वेबसिरीजबद्दल बोलली आहे. या किसिंग सीनवर प्रश्न विचारला असता श्रुती म्हणाली कि, आमच्यासाठी हा सीन खूपच मजेदार होता कारण आम्ही दोघीनींही असा सीन यापूर्वी कधीच केला नव्हता. पण आमचा दिग्दर्शक शादने (शाद अली) आम्हाला खूपच कंफर्टेबल केले आणि सहजपणे सीन करायला सांगितले. कितीही अस्वस्थ वाटले तरी अभिनेत्यांसाठी अभिनय करणे हेच जास्त महत्वाचे असते. तेच आमच्या बाबतीत घडले. आम्ही तो सीन नैसर्गिक वाटेल अशा पद्धतीने शूट करण्याचा प्रयत्न केला.

या मुलाखतीत श्रुती सेठला किसिंग सीनवर आलेल्या प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया देखील विचारण्यात आल्या होत्या. यावर ती म्हणाले की, आम्हाला प्रेक्षकांच्या प्रतिक्रियेची वाट पाहावी लागेल. श्रुती सध्या तिच्या वेब सीरिजचे जोरदार प्रमोशन करत आहे. या वेब सिरीजचे दिग्दर्शन शाद अली यांनी केले आहे. या वेब सिरीजमध्ये एकूण सहा भाग असतील. यात श्रुती आणि मुग्धाशिवाय झीशान अयुब, सतीश कौशिक, टीना देसाई असे अनेक स्टार्स आहेत. या वेब सीरिजबद्दल प्रेक्षकांना उत्सुकता आहे. त्यामुळे वेब सीरिजला प्रेक्षकांची पसंती मिळणार असे वाटत आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!