नवी दिल्ली: कोरोना महामारीची तिसरी लाट बऱ्यापैकी ओसरली आहे. पण तिसरी लाट ओसरली असली तरी देखील नवीन करोनाबाधित रुग्ण अजूनही आढळून येत आहेत. तसेच करोनाबाधित रूग्णांचे मृत्यू देखील होतच आहेत. चौथी लाट येण्याची शक्यताही तज्ज्ञांकडून वर्तवली जात आहे. याच पार्श्वभूमीवर कोरोनाला रोखण्यासाठी केंद्र सरकारने आणखी एक मोठे पाऊल उचलले आहे. १५ ते १८ वयोगटासाठी लसीकरण सुरु केल्यानंतर आता देशभरात १२ ते १४ वयोगटातील मुलांसाठीचे लसीकरण सुरू होणार आहे.
या संदर्भातील माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी ट्विट करत दिली आहे. येत्या बुधवारापसून म्हणजेच १६ मार्चपासून १२ ते १४ वयोगटातील मुलांनाही करोनावरील लस दिली जाणार आहे. तसेच, ६० वर्षांवरील वृद्धांनाही दक्षता डोस म्हणजेच बूस्टर डोस दिला जाणार आहे, असे मांडवीया यांनी जाहीर केले. काही महिन्यांपूर्वीच १५ वर्षांवरील मुलांच्या लसीकरणास सुरुवात करण्यात आली होती. त्यानंतर आता केंद्र सरकारने हा निर्णय घेतला आहे.
बच्चे सुरक्षित तो देश सुरक्षित!
मुझे बताते हुए खुशी है की 16 मार्च से 12 से 13 व 13 से 14 आयुवर्ग के बच्चों का कोविड टीकाकरण शुरू हो रहा है।
साथ ही 60+ आयु के सभी लोग अब प्रिकॉशन डोज लगवा पाएँगे।
मेरा बच्चों के परिजनों व 60+ आयुवर्ग के लोगों से आग्रह है की वैक्सीन जरूर लगवाएँ।
— Dr Mansukh Mandaviya (@mansukhmandviya) March 14, 2022


