Share

The Kashmir Files च्या शूटिंगदरम्यान काढण्यात आला होता फतवा; निर्मात्यांनी सांगितला धक्कादायक अनुभव

Published On: 

 नवी दिल्ली : काश्मिरी पंडितांच्या जीवनावर बनलेला ‘The Kashmir Files’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित ‘द काश्मीर फाईल्स’ हा चित्रपट धमाका करणारा ठरत आहे. या चित्रपटाला उदंड प्रतिसाद मिळत आहे. पण तुम्हाला माहीत आहे का की, ज्या चित्रपटाने प्रदर्शित झाल्यामुळे खळबळ उडाली आहे, तो चित्रपट पडद्यावर येणे इतके सोपे नव्हते. शूटिंगदरम्यान या चित्रपटाबाबत फतवेही काढण्यात आले होते.

कश्मीर फाइल्स हा छोट्या बजेटचा चित्रपट असून त्याचे प्रमोशन कमी झाले आहे, पण काश्मिरी पंडितांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट प्रेक्षकांची मने जिंकत आहे. या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान निर्मात्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला आहे. विवेक अग्निहोत्रीची पत्नी आणि निर्माती पल्लवी जोशी यांनी सांगितले की, चित्रपटाच्या शूटिंगच्या शेवटच्या दिवसांत त्यांच्याविरोधात फतवाही काढण्यात आला होता.

पल्लवी जोशी एका वृत्तवाहिनीशी बोलताना म्हणाल्या, “चित्रपटाचे शूटिंग हा आमच्या संपूर्ण प्रवासाचा एक छोटासा भाग होता. संपूर्ण संशोधन, लोकांपर्यंत पोहोचणे, चित्रपटासाठी पैसे उभे करणे, कलाकारांना चित्रपटासाठी एकत्र आणणे, हे सर्व मोठे आवाहन होते.

चित्रपटाचे शूटिंग करणे सोपे नव्हते, आम्ही या चित्रपटासाठी ४ वर्षे समर्पित केली आहेत, शूटिंगसाठी फक्त १ महिना लागला. शूटिंगदरम्यान एक गोष्ट घडली की आम्ही काश्मीरमध्ये शूटिंग करत असताना आमच्या नावाने फतवा काढण्यात आला. सुदैवाने जेव्हा हे घडले तेव्हा आम्ही आमच्या शेवटच्या सीनवर होतो. मी विवेकला म्हणाले, “चला लवकर हा सीन संपवून एअरपोर्टला जाऊया.”

“त्यानंतर आम्ही तो सीन पटकन संपवले आणि मी काही लोकांना हॉटेलवर पाठवले. तसेच त्यांना सामान पॅक करुन सेटवर येण्यास सांगितले. शूटिंगदरम्यान आमच्यासमोर हे एकमेव मोठं आवाहन होतं”, असे पल्लवी जोशी यांनी सांगितले.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!