Share

रणजी ट्रॉफी: धावांचा पाऊस! झारखंडने एकाच डावात ८८० धावा करत मोडला ३२ वर्ष जुना विक्रम

Published On: 

मुंबई: कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे जवळपास दोन वर्षानंतर रणजी करंडक स्पर्धा खेळवली जात आहे. नुकत्याच सुरु झालेल्या या स्पर्धेत इतिहास रचला गेला आहे. सध्या सुरू असलेल्या स्पर्धेच्या प्री-क्वार्टर फायनल कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर झारखंड आणि नागालँड यांच्यात खेळली जात आहे. याच सामन्यामुळे झारखंडने हा ३२ वर्ष जुना विक्रम मोडला आहे.

कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर झारखंड आणि नागालँड यांच्यातील रणजी ट्रॉफी (ranji trophy) २०२१-२२ च्या प्री-क्वार्टर फायनलमध्ये ३२ वर्ष जुना विक्रम मोडला गेला आहे. नागालँडने नाणेफेक जिंकून झारखंडला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. प्रथम फलंदाजी करताना झारखंडने ३०० ४०० नव्हे तर तब्बल ८८० धावांची डोंगराएवढी धावसंख्या उभारली. यासह झारखंडने रणजी ट्रॉफीचा चौथा सर्वोच्च विक्रम केला आहे. झारखंडने या डावात दुहेरी शतकासह एकूण ३ शतके झळकावली.

झारखंडने २०३.४ षटकात फलंदाजी केली आणि सर्वबाद ८८० धावा केल्या. कुमार कुशाग्राने झारखंडसाठी २६६ धावांची खेळी खेळली, त्याने अवघ्या २६९ चेंडूंमध्ये ३७ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने ही धावसंख्या उभारली. त्याच्याशिवाय शाहबाज नदीमने १७७ धावा केल्या आणि ३०४ चेंडू खेळले, ज्यामध्ये त्याने २२ चौकार आणि २ षटकार मारले. झारखंडसाठी तिसरे शतक विराट सिंगने झळकावले ज्याने १५५ चेंडूत १०७ धावा केल्या. त्याने एकूण १३ चौकार मारले. रणजी मध्ये सर्वात जास्त ९४४ धावसंख्या हैद्राबादने आंध्र प्रदेश विरुद्ध १९९३-९४ मध्ये केली होती.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!