पुणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी काल १ मे रोजी औरंगाबादेत सभा घेतली. यावेळी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगडावरील समाधीविषयी मोठे वक्तव्य केले. रायगड किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी लोकमान्य टिळकांनी बांधली होती, असा उल्लेख त्यांनी आपल्या भाषणात केला होता. यामुळे एका नवीन वादाला तोंड फुटले आहे. दरम्यान, या मुद्द्यावरून आता इतिहास संशोधक श्रीमंत कोकाटे (Shrimant Kokate) यांनी टीका केली आहे.
यासंदर्भांत प्रसार माध्यमांशी संवाद साधत असतांना श्रीमंत कोकाटे म्हणाले की,‘शिवरायांच्या नावावरती पैसे खाणाऱ्या टिळकांनी रायगडावर एक साधा दगडही बसवला नाही. त्या टिळकांनी शिवसमाधीचं बांधकाम केलं, असं धादांत खोटं राज ठाकरे बोलत आहे’, कोकाटे म्हणाले.
दरम्यान, पुढे ते म्हणाले की,‘इतिहासाची तोडामोड करून दिशाभूल करणारे राज ठाकरे यांचे कालचे भाषण होते.’ तसेच खोटं पण रेटून कसं बोलावं हे राज ठाकरेंकडून शिकावं. महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये इतका खोटारडा नेता झाला नसेल, असेही कोकाटे यावेळी म्हणाले.
महत्वाच्या बातम्या:
- “ताई तुज ‘गुणी’ म्हणू की ‘अवगुणी’ गं?”, अमृता फडणवीस यांच्या टीकेवर शिवसेनेची प्रतिक्रिया!
- IPL 2022 SRH vs CSK : मॅच जिंकत असताना कॅप्टन धोनी तापला; ‘या’ खेळाडूवर काढला राग!
- “देश इस्लामच्या दिशेने जातोय, हिंदू राष्ट्राची स्थापना राजकारणातून शक्य”- कालीचरण महाराज
- “इतिहास बदलण्याची ताकद राऊतांमध्ये नाही”; आशिष शेलारांचा घणाघात
- “इतरांना श्रेय देऊन चुकीचा इतिहास पेरल्या जात असेल तर…”, राज ठाकरेंच्या ‘त्या’ दाव्यानंतर मिटकरींचा इशारा


