मुंबई : दिवगंत अभिनेता सुशांतसिंग राजपूतच्या आत्महत्येमुळे बॉलीवूडमध्ये खळबळ उडाली होती. आता पुन्हा एकदा मनोरंजन सृष्टीला मोठा धक्का बसला आहे. मराठी सिनेमा आणि टेलिव्हीजन इंडस्ट्रीत कला दिग्दर्शक राजू साप्ते यांनी आज आत्महत्या केली. राजू साप्ते यांनी आपल्या पुण्यातील घरात आत्महत्या करण्यापूर्वी एक व्हिडीओ तयार केला आहे. त्यामध्ये त्यांनी आत्महत्येचं कारण सांगितल आहे. ‘नमस्कार मी राजेश मारुती साप्ते. मी एक आर्ट डिरेक्टर आहे. मी आता कोणतीही नशा केलेली नाही. पूर्ण विचारपूर्वक मी हा निर्णय घेत आहे. कारण मला काही गोष्टींचा खूप त्रास होत आहे. हा व्हिडीओ बनवताना मी भानावर आहे. गेल्या काही दिवसांपासून मला लेबर युनियनमधल्या राकेश मौर्या यांच्याकडून खूप त्रास दिला जात आहे.’
पुढे ते म्हणाले, मी आतापर्यंत केलेल्या कामाचे कोणतेही पैसे थकीत नाहीत, सर्व पेमेंट पूर्ण झालेलं असतानाही राकेश मोर्या कामगारांना भडकवत आहेत. त्यामुळे माझे अनेक प्रोजेक्ट अडकले आहेत. माझं पुढचं काम राकेश मोर्या सुरु करु देत नाहीत. माझ्याकडे सध्या ५ प्रोजेक्ट आहेत. एक प्रोजेक्ट मला याच कारणामुळे सोडावं लागलं. या गोष्टीचा निषेध म्हणून मी आत्महत्या करत असल्याचं साप्ते यांनी व्हिडिओत म्हटलं आहे. तसेच, मला न्याय मिळावा अशी मागणीही त्यांनी याच व्हिडिओ द्वारे केली.
त्यांच्या या व्हिडिओनंतर सगळीकडे खळबळ उडाली आहे. या प्रकरणावर यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. यावर आता मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक केदार शिंदे यांनी देखील संताप व्यक्त केला आहे. त्यांनी ट्विट करत राजकारणावर निशाणा साधला आहे. ट्विट करत केदार शिंदे म्हणाले, सुशांतसिंग राजपुत गेला… केवढी कळवळ तळमळ.. राजकारण तापलं.. आमचा राजू साप्ते तंत्रज्ञ गेला ‘बाराचे’ एकही बोलले नाहीत.. वर्षभरापूर्वी सतत टीव्हीवर टाहो फोडला जायचा!!! मराठी माणसाची ही किंमत!!!! असं म्हणतं त्यांनी खंत व्यक्त केली आहे.
#SushantSinghRajput गेला… केवढी कळवळ तळमळ.. राजकारण तापलं.. आमचा #RajuSapte तंत्रज्ञ गेला "बाराचे" एकही बोलले नाहीत.. वर्षभरापूर्वी सतत टीव्हीवर टाहो फोडला जायचा!!! मराठी माणसाची ही किंमत!!!!
— ???????????????????? ???????????????????????? (@mekedarshinde) July 5, 2021
महत्वाच्या बातम्या
- बनावट कागदपत्राआधारे जमीनीची विक्री करून फसवणूक, चार जणांविरूध्द गुन्हा दाखल
- पश्चिम बंगालमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! प्रणव मुखर्जींचे पुत्र ‘तृणमूल’मध्ये
- मोहन भागवतांच्या ‘त्या’ वक्तव्यावर ओवेसी म्हणाले, ‘ही तर हिंदुत्त्वाचीच देण’
- ‘हिंदू-मुस्लिम वेगवेगळे नाहीत, सर्वांचा डीएनए एकच’, मोहन भागवत यांचे वक्तव्य
- ‘मराठा समाजाच्या प्रश्नांवर वादविवाद नकाे’, संभाजीराजेंचे आवाहन


