औरंगाबाद : वारंवार होत असणाऱ्या डॉक्टरांवरील हल्ल्यांच्या निषेधार्थ १८ जून रोजी देशभरात विविध ठिकाणी आंदोलन करण्यात आली. औरंगाबाद आय एम ए हॉल येथे इंडियन मेडिकल असोसिएशन औरंगाबाद शाखेतर्फे निषेध सभा घेण्यात आली. यावेळी डॉक्टरांनी काळा दिवस पाळला.
याप्रसंगी बोलताना अध्यक्ष डॉक्टर संतोष रंजलकर यांनी आपले मत व्यक्त करताना सांगितले की, डॉक्टरांवरील हल्ले ही दुर्दैवाची बाब आहे. डॉक्टरांना प्रॉपर्टी टॅक्स, इन्कम टॅक्स, पाणीपट्टी किंवा कुठल्याही करांमध्ये मध्ये सवलत मिळत नाही. असे असतानाही डॉक्टरांकडून मात्र अविरत जनसेवेची अपेक्षा केली जाते. डॉक्टर ती पूर्ण देखील करण्याचा प्रयत्न करतो. परंतु केवळ गैरसमजातून अविरत जनसेवा करणाऱ्या व्यक्ती वर हल्ले करायचे ही मानसिकता आता बदलायला हवी.
त्यानंतर सचिव डॉ यशवंत गाडे म्हणाले की, डॉक्टरांवर हल्ला करण्याआधी समाजाने त्याचे काय दूरगामी दुष्परिणाम होईल याविषयी विचार करणे गरजेचे आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात किंवा शासकीय रुग्णालयामध्ये असणारी औषधांची कमतरता तेथे असणारी अस्वच्छता अपुरा स्टाफ याचा अप्रत्यक्ष प्रभाव हा तिथे काम करणाऱ्या डॉक्टरांच्या मानसिकतेवर पडत असतो. त्यामुळे भारत सरकारने आणि महाराष्ट्र सरकारने वार्षिक बजेट मध्ये आरोग्य खात्याला वाढीव बजेट देणे ही काळाची गरज आहे.
सध्या डॉक्टर पेशंट यांचे नाते संबंध दुष्टचक्रात अडकले आहे. एकमेकांवरील विश्वास वाढवणे ही काळाची गरज आहे. डॉक्टर त्याच्या परीने नातेसंबंध टिकून राहावे आणि अधिक वृद्धिंगत व्हावे याविषयी सदैव प्रयत्न करत असतोच पण आता समाजाचेही एक कर्तव्य आहेत की त्याने देखील हे नाते कसे घट्ट विणल्या जाईल याविषयी सजग प्रयत्न करावे. अन्यथा नुकसान समाजाची जास्त होईल. डॉक्टरांना देव मानण्यापेक्षा माणूस म्हणून माणुसकी दाखवा. डॉक्टर वर होणारे हल्ले, त्यांचे होणारे मानसिक खच्चीकरण थांबणे ही काळाची गरज आहे. याप्रसंगी बोलताना उपाध्यक्ष डॉक्टर अनुपम टाकळकर यांनी आपल्या अशा भावना व्यक्त केल्या.
डॉक्टर आपले सर्व शिक्षण पणाला लावून रूग्ण कसा बरा होईल याविषयी प्रयत्नशील असतो. रुग्णाने देखील आपली जबाबदारी ओळखून डॉक्टरांना सहकार्य करणे आवश्यक आहे. असे प्रतिपादन उपाध्यक्ष महिला डॉक्टर उज्वला दहिफळे यांनी केले.
याप्रसंगी सहसचिव डॉक्टर प्रफुल्ल जाताळे, कोषाध्यक्ष डॉ हर्मित बिंद्रा, माजी अध्यक्ष डॉ दत्ता कदम, डॉ उज्वला झंवर, डॉ अर्चना भांडेकर, डॉ अरुण मरवळे, डॉ मिष्रिकोटकर, डॉ प्रशांत जाधव, डॉ केदार साने, डॉ सुनील धुळे, डॉ कुंदा धुळे, डॉ गितेश दळवी, डॉ सागर कुलकर्णी आदी डॉक्टरांची उपस्थिती होती. निषेध सभा आटोपल्यानंतर दिवसभर डॉक्टरांनी काळया फिती लावून काम केले.
महत्त्वाच्या बातम्या
- न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्याआधी कर्णधार विराटाचे मोठे वक्त्यव्य, म्हणाला…
- वैजापूरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या सभापतींसह, तीन संचालकांना ‘या’ कारणामुळे नोटीसा, राजकीय वर्तुळात खळबळ!
- सुपर न्यूमररी ते युवकांवरील गुन्हे; मराठा आरक्षणाच्या बैठकीनंतर राज्य सरकारची महत्वाची भूमिका !
- आदित्य ठाकरेंच्या पुढाकाराने मुंबई, पुणे, नागपूरसह औरंगाबादचा रेस टू झिरो मोहिमेत सहभाग!
- …जेव्हा गँगस्टर नातीला खेळवतो! अरुण गवळीचा फोटो होतोय व्हायरल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
