🕒 1 min read
पैठण: पैठणचे मुख्याधिकारी सोमनाथ जाधव यांच्याकडे नगर पालिका विभाग औरंगाबाद येथे जिल्हा नियोजन अधिकारी पदाचा अतिरिक्त पदभार असल्याने ते जिल्हाधिकारी कार्यालयातील नगरपरिषद विभागात कामकाज पाहत आहेत. याच गोष्टीचा गैरफायदा पैठण नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांनी उचलला आहे.
वसुलीच्या नावाखाली नगर परिषदेच्या कार्यालयाकडे अनेक कर्मचारी फिरकेनासे झाले आहेत. मात्र यामुळे कामासाठी येणाऱ्या नागरिकांना आल्यापावली परत माघारी फिरावे लागत आहे. आता अशा ९ कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्या आहेत. नगरपरिषद कार्यालयाची वेळ सकाळी ९:४५ ते सायंकाळी ६:१५ वाजेची आहे.
यावेळेत बहुतेक कर्मचारी वसुलीच्या नावाखाली दिवसभर कार्यालयाकडे फिरकत नसल्याचे दिसून आले आहे. काही कर्मचारी तर चक्क दुपारी घरी निघून वामकुक्षी घेत असल्याची खात्री लायक माहिती हाती आली आहे. कार्यालयात तीन ते चार कर्मचारी आपले कर्तव्य पार पाडत असल्याचे दिसून येत आहे.
नऊ कर्मचाऱ्यांना मुख्याधिकाऱ्यांनी बजावल्या कारणे दाखवा नोटीस
कार्यालयीन वेळेत कार्यालयात अनुपस्थित असणे व भ्रमणध्वनी बंद ठेवणे या कारणावरून नगराध्यक्ष सुरज लोळगे यांच्या आदेशावरून मुख्याधिकारी सोमनाथ जाधव यांनी नऊ कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटिसा बजावल्या आहेत. यामध्ये आनंद केदार सहाय्यक नगर रचनाकार, आसिफ खान लेखापाल, अरुण गायके संगणक अभियंता, अमित सोनवणे स्थापत्य अभियंता, यशवंत मुंढे स्वच्छता व पाणीपुरवठा अभियंता, ऋषिकेश जगताप रचना सहाय्यक, कैलास मगरे कर निर्धारण, मदन गुसिंगे कर निर्धारण, साईनाथ फुले या ९ जणांना नोटीसा बजावण्यात आल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- धक्कादायक : अकोल्यातून चक्क कोरोना लसींच्या बॉटल्स गेल्या चोरीला !
- स्वतःला बायकोचे ‘मालक’ समजणाऱ्यांना कायदेशीर तरतूदींमागची खोली कशी कळणार ? – चित्रा वाघ
- जावयाची वरात पोलिसांच्या दारात, सासरवाडीचे घर फोडून वीस हजारांवर डल्ला
- याद राखा…विदर्भ आणि मराठवाड्यासाठी आम्ही सरकारला सोडणार नाही; मुनगंटीवारांचा इशारा
- ‘प्रदेशाध्यक्षांच्या मिरवणुकीला कोरोना नसतो मात्र शिवजयंती वेळी कोरोना समोर येतो !’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
