🕒 1 min read
मुंबई : महिलांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात महाराष्ट्रात आवाज बुलंद होत असताना महिला पुरुषासोबत वर्षभर लिव्ह इन रिलेशनमध्ये राहतात आणि नंतर सांगतात माझा बलात्कार झाला, असं धक्कादायक विधान समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांनी करत महिलांनाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभा केले आहे.
‘पडद्याशिवाय राहिलात, पुरुषांमध्ये फिरलात, लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहिलात, तर अशा गोष्टी होण्याची शक्यता वाढते. अशा गोष्टींची तक्रार झाल्यानंतर पुरुषाचं नाव मीडियात अजिबात येता कामा नये” अशी मागणी देखील अबू आझमी यांनी केली.
देशात कायदा चुकीचा आहे. कायद्यानुसार कोणतीही स्त्री लग्नाशिवाय कोणत्याही व्यक्तीसोबत राहू शकते. लिव्ह इन रिलेशनमध्ये. लिव्ह इन रिलेशन म्हणजे काय तर, महिला पुरुषासोबत लिव्ह इन रिलेशनमध्ये राहू देता त्यांच्यावर कोणताही गुन्हा नाही आणि वर्षभरानंतर सांगतात माझा बलात्कार झाला,’ अशी टिप्पणी अबू आझमी यांनी केली आहे.
अबु आझमी यांच्या या वादग्रस्त विधानामुळे अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी देखील अबू आझमींना चोख प्रत्युत्तर देत त्यांच्या विधानाचा निषेध केला आहे. ‘लिव्ह इन …म्हणजे सोबत राहणं फक्त…तो शरीरसंबंधांचा परवाना नाही. अबू आझमीना हे माहित नसेल लग्नाची बायकोही नवऱ्याविरोधात बलात्काराची तक्रार करू शकते. स्वतःला बायकोचे “मालक” समजणाऱ्यांना अशा कायदेशीर तरतूदींमागची खोली कशी कळणार ?’ अशी टीका चित्रा वाघ यांनी केली आहे.
लिव्ह इन …म्हणजे सोबत राहणं फक्त…तो शरीरसंबंधांचा परवाना नाही
अबू आझमीना हे माहित नसेल लग्नाची बायकोही नवऱ्याविरोधात बलात्काराची तक्रार करू शकते
स्वतःला बायकोचे *मालक* समजणाऱ्यांना अशा कायदेशीर तरतूदींमागची खोली कशी कळणार ? pic.twitter.com/mWZumninMZ
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) February 17, 2021
महत्त्वाच्या बातम्या
- ‘मराठा आरक्षणाच्या केसमध्ये मुख्यमंत्रीसाहेब तुम्ही स्वतः लक्ष घालावं; हलगर्जीपणा करु नये’
- भले शाब्बास! औरंगाबादने ‘या’ गोष्टीत मोदींच्या वाराणसी व अहमदाबादलाही मागे टाकले
- आम्हीच श्रीरामांचे वंशज, भाजपला श्रीरामचंद्रांशी काही घेणं देणं नाही – राकेश टिकैत
- भाजपवर बांग्लादेशी अल्पसंख्यांकांना पद देण्याची नामुष्की आली?
- ‘राकेश टिकैत यांच्या आंदोलनाचे शेतकरी हिताशी काहीही देणे घेणे नाही’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
