Share

‘प्रदेशाध्यक्षांच्या मिरवणुकीला कोरोना नसतो मात्र शिवजयंती वेळी कोरोना समोर येतो !’

Published On: 

मुंबई : राज्यात कोरोना आटोक्यात आल्यामुळे राज्यभरात शिवजयंती दिनी वेगवेगळ्या कार्यक्रमांचं नियोजन करण्यात आलं होतं. मात्र, कोरोना पुन्हा एकदा बळावत असल्याचं कारण देत शिवजयंतीवर ऐनवेळी निर्बंध घालण्यात आल्याने भाजप, मनसेसह राज्यभरातील शिवभक्तांनी संताप व्यक्त केला आहे. तर दुसरीकडं, विविध पक्षांचे मोर्चे, आंदोलने सर्रास सुरु असल्याचं दिसून आलं आहे. राज्य सरकारमधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने राज्यबहारात संवाद यात्रा काढून मेळावे घेतले, तर काँग्रेसने नाना पटोले यांचा प्रदेशाध्यक्ष पदग्रहण सोहळा रॅली काढत धुमधडाक्यात केला.

येत्या काळात शिवसेना देखील राज्यभरात ‘शिवसंपर्क’ अभियान राबवणार आहे. याबाबत मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नेत्यांना आदेश देखील दिले आहेत. त्यामुळे शिवजयंतीवरच बंधन का ? असा सवाल उपस्थित होत आहे. यावर भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी भाष्य केलं आहे.

‘प्रदेशाध्यक्षांची मिरवणूक असेल तर कोरोना नाही. मात्र अधिवेशन असेल तर कोरोना आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीसाठी कोरोना आहे. अधिवेशनाची वेळ आली की सरकारमधील मंत्री लगेच कोरोना वाढतो आहे, असं सांगतात आणि लॉकडाऊनची भाषा करु लागतात,’ अशी टीका त्यांनी केली आहे. पुढे त्यांनी, ‘हा कोरोना एखाद्या राजकीय पक्षाप्रमाणे वेगाने रंग बदलतोय,’ असा मिश्किल टोला देखील लगावला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!