बीड : घरात कोणी नसल्याची संधी साधत जावयाने चोरी केल्याचा प्रकार परळी तालुक्यातील सिरसाळा गावात उघडकीस आला. याप्रकरणी सासू सुनीता कांबळे (रा.पोलिस कॉलनी) सिरसाळा यांच्या फिर्यादीवरून सिरसाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुनिता खंडूराव कांबळे यांनी दिलेल्या फिर्यादीनूसार, त्यांची मुलगी हेमा एक वर्षापासून त्यांच्याकडेच राहते. त्यामुळे तिचा पती गोपाळ उत्तम कसबे (रा. वानटाकळी, ता. परळी) हा नेहमी त्यांच्याकडे येतो. गोपाळने त्याचे आधार कार्ड व इतर कागदपत्रे सासरवाडीत ठेवली होती. बुधवारी (दि.१०) सुनीताबाई व कुटुंबीय नातेवाइकाच्या लग्नासाठी सातेफळला गेले होते. त्यावेळी गोपाळने सासरे खंडूवाव कांबळे यांना फोन केला आणि कागदपत्रे मागितली.
त्यांनी घरी आल्यावर देतो असे सांगताच संतापलेल्या गोपाळने घराचे कुलूप तोडून पत्र्याच्या पेटीत ठेवलेले त्याचे कागदपत्रे व रोख २० हजार रुपये चोरून नेले. सोमवारी (दि.१५) घरी परतल्यावर सुनीता कांबळे यांना चोरी झाल्याचे लक्षात आले. त्यांनी जावयाला फोन केला असता त्याने हो मीच चोरी केली, काय करायचे ते करून घ्या असे उत्तर दिले. सिरसाळा पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा नोंद केला.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘मराठा आरक्षणाच्या केसमध्ये मुख्यमंत्रीसाहेब तुम्ही स्वतः लक्ष घालावं; हलगर्जीपणा करु नये’
- भले शाब्बास! औरंगाबादने ‘या’ गोष्टीत मोदींच्या वाराणसी व अहमदाबादलाही मागे टाकले
- आम्हीच श्रीरामांचे वंशज, भाजपला श्रीरामचंद्रांशी काही घेणं देणं नाही – राकेश टिकैत
- भाजपवर बांग्लादेशी अल्पसंख्यांकांना पद देण्याची नामुष्की आली?
- ‘राकेश टिकैत यांच्या आंदोलनाचे शेतकरी हिताशी काहीही देणे घेणे नाही’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
