Share

रस्त्याच्या परिवर्तनाकरिता ‘स्मार्ट सिटी’सोबत आता कॅनॉट परिसरातील दुकानदारांचे सहकार्य

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद :  कॅनॉट प्लेस येथील व्यापारी संघटनेने औरंगाबाद महानगरपालिका (मनपा) आणि औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (एएससीडीसीएल) कनॉटच्या रस्त्याच्या परिवर्तनासाठी काम करण्यास सहमती दर्शवली आहे. त्यामुळे रस्ते परिवर्तना करीता त्यांचे सहकार्य लाभणार आहे.

एएससीडीसीएल आणि मनपाने स्ट्रीट्स फॉर पीपल चॅलेंज अंतर्गत स्ट्रीट ट्रान्सफॉर्मेशनसाठी कॅनॉट स्ट्रीटची निवड केली आहे. या अनुषांगाने मंगळवारी एएससीडीसीएलने कॅनॉट प्लेस व्यापारी संघटनेसोबत बैठक आयोजित केली होती. मनपा आयुक्त पांडेय यांनी दुकानदारांना सांगितले की, ‘कॅनॉटचे वाहतूक व्यवस्थापन बिघडले आहे. जर तुम्हाला तुमची बाजारपेठ टिकून राहण्याची खात्री करायची असेल तर तुमच्यासाठी स्मार्ट सिटी टीमसोबत काम करण्याची एक चांगली संधी आहे. जेणेकरून रहदारीची परिस्थिती सुधारेल आणि ते भेट देण्याचे एक सुखद ठिकाण होईल.’

असे आहे डिझाइन :  बैठकीदरम्यान, एएससीडीसीएलने रस्त्याच्या परिवर्तनासाठी प्रस्तावित डिझाइन सादर केले. डिझाइनमध्ये पादचारी मार्ग, पार्किंग आणि रस्त्यावर सुशोभीकरणासाठी जागा निश्चित करणे आदींचा समावेश करण्यात आलेला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!