🕒 1 min read
नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून एमपीएससीच्या तीन सदस्यांच्या नियुक्तीचा विषय चर्चेत आहे. आधी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेल्या शब्दावरून विरोधकांनी टीका केली. तर, त्यानंतर तो विषय राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे अडकल्याची टीका महाविकास आघाडीने केली होती.
दरम्यान, नियुक्तांचा प्रश्न मार्गी लागल्यानंतर आता नियुक्ती करण्यात आलेल्या सदस्यांवरून राज्याचे मंत्री विजय वडेट्टीवार यांच्यासह इतर काही नेत्यांनी देखील नाराजी व्यक्त केली आहे. नियुक्त केलेले सदस्य हे मराठा समाजातीलच असून इतर समाजातील सदस्यांची देखील नेमणूक झाली पाहिजे असं भाष्य वडेट्टीवार यांनी केलं होतं. विशेष म्हणजे वडेट्टीवार यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निवडीवरच नाराजी व्यक्त केली होती.
आता भाजप खासदार प्रीतम मुंडे यांनी आज १०२ व्या घटना दुरुस्तीबाबत लोकसभेत बोलताना राज्य सरकारच्या या नियुक्तीवर निशाणा साधला आहे. ‘MPSC परीक्षा होऊन, विद्यार्थ्यांनी मेहनत करुन इतकी वर्ष झाली. त्यांच्या नियुक्तीच झाल्या नाहीत कारण आरक्षणामुळे निर्णय झाला नाही. त्या विद्यार्थ्यांना न्याय कधी मिळणार? MPSC आयोगामध्ये ठराविक एका जातीच्याच लोकांची नियुक्ती होते आणि बाकीच्या जातींकडे दुर्लक्ष होतं, या सर्व गोष्टींकडे आपण सगळ्यांनी कळवळ दाखवली तर तुम्ही शोषितांचे वंचितांचे प्रश्न विचारताय हे सिद्ध होईल,’ असं म्हणत प्रीतम मुंडे यांनी महाविकास आघाडीतील नेत्यांना लक्ष्य केलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- मंत्रिमंडळ “खो खो” आणि अनिल देशमुख सध्या लपाछपी खेळताय, भाजपचा टोला
- ‘स्वबळा’च्या घोषणेनंतर आणि प्रदेशाध्यक्ष पदाची सूत्रे घेतल्यानंतर नाना पटोले प्रथमच औरंगाबादेत!
- संत-महंतांच्या भूमीत या सरकारने संस्कृती आणि परंपरेचा सत्यानाश केलाय – चंद्रकांत पाटील
- ‘लोकउपयोगी कामे केली म्हणून गुन्हा माफ होत नाही’ ; चंद्रकांत पाटलांचा मुख्यमंत्र्यांना टोला
- ठरलं ! 17 ऑगस्टपासून राज्यातील ‘या’ इयत्तेचे वर्ग भरणार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
