मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात ईडी आणि सीबीआयची कारवाई सुरु आहे. अनिल देशमुख आणि मुलगा ऋषिकेश देशमुख यांना ईडीने समन्स बजावले आहेत. अनिल देशमुख यांनी प्रकृतीचे कारण देत चौकशीस हजर राहणार नसल्याचे सांगितले आहे. राज्य सरकारचे मंत्री तुरुंगात जाऊन आले तर माजी मंत्री जाण्याच्या तयारीत आहेत. अशी खोचक टीका भाजप नेते अतुल भातखळकर यांनी केली आहे. ठाकरे सरकारमधील मंत्रिमंडळात खो-खो चा खेळ सुरु आहे. तर देशमुख लपाछपी खेळतायत असा टोलाही अतुल भातखळकर यांनी लगावला आहे.
भाजप नेते अतुल भातखळकर यांनी ट्विट करत राज्य सरकारवर हल्लाबोल केला आहे. ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळात “खो खो” खेळ सुरु आहे. महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख सध्या लपाछपी खेळतायत. दूध का दूध, पानी का पानी ची गर्जना करणारे गेले काही दिवस गायब आहेत. बहुधा त्यांचं दूध नासलंय असा टोला भातखळकर यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी लगावला आहे. राज्यातले एक मंत्री तुरुंगात जाऊन आले आहेत. देशमुख जाण्याच्या तयारीत आहेत. ठाकरे मंत्रिमंडळात खो खो चा खेळ सुरु आहे. अशी टीका अतुल भातखळकर यांनी केली आहे.
महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख सध्या लपाछपी खेळतायत. दूध का दूध, पानी का पानी… ची गर्जना करणारे गेले काही दिवस गायब आहेत. बहुधा त्यांचं दूध नासलंय.
राज्यतले एक मंत्री तुरुंगात जाऊन आले आहेत, देशमुख जाण्याच्या तयारीत आहेत. ठाकरे मंत्रिमंडळात 'खो खो' चा खेळ सुरू आहे.— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) August 10, 2021
दरम्यान, अनिल देशमुख यांनी ईडीच्या कार्यालयात चौकशीला जाण्यास नकार देत होता. ईडीला वकिलांमार्फत पत्र दिले होते. माझी व्हिडिओ, ऑडिओद्वारे चौकशी करा, अशी मागणी पुन्हा एकदा केली होती. तसंच, मला ECIR ची प्रत द्या किंवा कमीतकमी माझ्याकडून हव्या असलेल्या कागदपत्रांची यादी द्या, अशी देखील मागणी केली होती.
महत्त्वाच्या बातम्या
- ऑस्ट्रेलियाविरुद्ध शकिब अस हसनने ओलांडला मैलाचा टप्पा, अशी कामगीरी करणारा ठरला पहिलाच खेळाडू
- व्यवसायिक आस्थापनांना लागणार पूर्ण शुल्क, गुंठेवारी कक्षातील अधिकाऱ्यांची माहिती
- अल्प मदत जाहीर करून राज्य सरकारने पूरग्रस्तांची थट्टा केली; सुधीर मुनगंटीवार यांचे टीकास्त्र
- ‘भास्कर जाधव तुझी औकात २०२४ ला तुला दाखवून देऊ; आता जेवढं उडायचं तेवढं उडून घे’


