🕒 1 min read
औरंगाबाद : मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरुन जोरदार राजकारण सुरु असताना केंद्र सरकारने याबाबत मोठे पाऊल उचलले आहे. आता मराठा आरक्षण देण्याचे अधिकार राज्य सरकारला आहे. अशी नवीन सुधारणा आज लोकसभेत करण्यात आली. महाविकास आघाडीतील राज्य सरकारच्या सर्व नेत्यांनी सत्ता मिळवण्यासाठी सुप्रिम कोर्टात जेवढे प्रयत्न केले तेवढेच प्रयत्न मराठा आरक्षणासाठी करावेत. मराठा तरुणांच्या सहनशीलतेचा अंत न पाहता टिकणारे आरक्षण द्यावे अशी मागणी मराठा आरक्षण याचिकाकर्ते, आर. आर. फाउंडेशनचे अध्यक्ष विनोद पाटील यांनी केली आहे.
१०२ व्या घटना दुरुस्तीत बदल करणारे विधेयक सरकारने आज लोकसभेत मांडले. मराठा आरक्षणाच्या निकालानंतर केंद्र सरकारने हे महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. याबाबत बोलताना पुढे विनोद पाटील मम्हणाले आता राज्य सरकारने क्षणाचाही विलंब न करता मराठा समाजाला आरक्षण द्यावे. मराठा आरक्षणाबाबत अधिकार राज्य सरकारला देण्यात आले आहेत. अशी नवीन सुधारणा आज लोकसभेत झाली. उद्या राज्यसभेत देखील होईल. एकमताने हा निर्णय घेण्यात आला.
याचा निश्चितच फायदा होईल. याच बरोबरीने जर अपवादात्मक परिस्थितीबाबत निर्णय झाला असता तर अधिक फायदा झाला असता. राज्य सरकारने क्षणाचाही विलंब न करता राज्यसभेत पारित झाल्यानंतर तात्काळ आयोगाला सूचना कराव्या. या आयोगामध्ये जुने अनुभवी मराठा समाजातील चार सदस्य नियुक्त करून तात्काळ कालमर्यादेत अहवाल घ्यावा.
आणि टिकणारे मराठा आरक्षण द्यावे. तसेच केंद्र सरकारने राज्याला अधिकार दिले म्हणून केंद्राची जबाबदारी संपत नाही त्यांनादेखील राज्य सरकार सोबत मराठा आरक्षण देण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. अपवादात्मक परिस्थिती सिद्ध करणेही आता राज्य सरकारच्या हातात असल्याचे ते म्हणाले. मात्र ५० टक्क्यांची निर्बंधाची अट शिथील करण्याची मागणी विरोधकांकडून करण्यात आली होती. त्याचे काय असाही प्रश्न याठिकाणी उपस्थित होत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- मध्यवर्ती बसस्थानक उभारण्याचा मार्ग झाला खुला मनपाकडून मिळाली शुल्कमाफी
- तरच महाविकास आघाडी सरकार ऐकेल; भाजपचा इशारा
- ‘NDA चा भाग होता तेव्हा मराठा आरक्षणासाठीचा हा कळवळा कुठे गेला होता ?’; मुंडे शिवसेनेवर संतापल्या
- ‘बालाजी तांबे यांच्या निधनाने एक ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व हरपले’- फडणवीस
- मनपा चाचण्यांची संख्या करणार दुप्पट….आता दररोज ५ हजार चाचण्या
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
