मुंबई : कोरोना रोगाने गेल्यावर्षीपासून देशासह जगभरात थैमान घातला आहे. अनेक देश या रोगातून सावरत असून भारताला दुसऱ्या लाटेचा फटका बसला. कोरोनाची दुसरी लाट ही पहिल्याहून अधिक भयंकर होती. या लाटेचे सर्वाधिक परिणाम महाराष्ट्रात दिसून आले. राज्यातील स्थिती आता आटोक्यात येत असून अद्यापही अनेक जिल्ह्यांमध्ये चिंता कायम आहे.
एका बाजूला ही परिस्थिती असताना दुसऱ्या बाजूला राज्यातील विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी आली आहे. येत्या 17 ऑगस्टपासून राज्यातील शाळा सुरू होणार अशी माहिती आज शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. येत्या 17 ऑगस्टपासून शाळा सुरु करण्यासंदर्भातील शासन निर्णय शालेय शिक्षण विभागाकडून जारी करण्यात आला आहे. राज्यातील कोरोना संसर्ग कमी झालेल्या भागातील निर्बंध शिथील केल्यानंतर सरकारचा हा निर्णय महत्वाचा मानला जात आहे.
यामध्ये राज्यातील ग्रामीण भागात 17 ऑगस्ट 2021 पासून इयत्ता 5 वी ते 7 वी चे वर्ग आणि शहरी भागात इयत्ता 8 वी ते 12 वी चे वर्ग सुरु करण्यास शासनाने परवानगी दिली आहे. यावेळी जरी करण्यात आलेल्या शासन नियमात म्हटले आहे कि, राज्यातील ग्रामीण भागात इयत्ता 5 वी ते 7 वी चे वर्ग व शहरी भागातील इयत्ता 8 वी ते 12वी चे वर्ग सुरु करण्यास परवानगी देण्यात येत आहे. मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे शहरातील कोविड परिस्थिती विचारात घेवून शाळा सुरू करणेबाबत निर्णय घेण्यासाठी संबंधित महानगरपालिका आयुक्त यांना प्राधिकृत करण्यात येत आहे.
तसेच दिनांक 2 ऑगस्ट, 2021 रोजीच्या ब्रेक द चेन मधील सुधारीत मार्गदर्शक सूचनानुसार कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, पुणे, अहमदनगर, बीड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, पालघर जिल्ह्यातील कोविड परिस्थिती विचारात घेवून व अन्य जिल्ह्यांबाबत देखील शाळा सुरू करणेबाबत निर्णय घेण्यासाठी संबंधित जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांना प्राधिकृत करण्यात येत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- मंत्रिमंडळ “खो खो” आणि अनिल देशमुख सध्या लपाछपी खेळताय, भाजपचा टोला
- ‘स्वबळा’च्या घोषणेनंतर आणि प्रदेशाध्यक्ष पदाची सूत्रे घेतल्यानंतर नाना पटोले प्रथमच औरंगाबादेत!
- संत-महंतांच्या भूमीत या सरकारने संस्कृती आणि परंपरेचा सत्यानाश केलाय – चंद्रकांत पाटील
- ‘लोकउपयोगी कामे केली म्हणून गुन्हा माफ होत नाही’ ; चंद्रकांत पाटलांचा मुख्यमंत्र्यांना टोला
- प्रवाशांना दिलासा! नांदेड-श्रीगंगानगर एक्स्प्रेस पुन्हा धावणार


