Share

स्मिथसह इतर ऑस्ट्रेलियन खेळाडूंना ‘या’ अटीवर मिळणार आयपीएलमध्ये एन्ट्री

Published On: 

मुंबई : डियन प्रीमियर लीगच्या 14 व्या हंगामाची सर्व संघांकडून जय्यत तयारी सुरू झाली आहे. आयपीएल स्पर्धेचे यंदाच्या मोसमातील साखळी फेरीचे सर्व सामने महाराष्ट्रत होणार असून बाद फेरीचे सामने अहमदाबादमध्ये होणार आहेत, असे संकेत बीसीसीआयने दिले आहेत.

आयपीएलच्या १४ व्या मोसमातील साखळी फेरीतील सामन्यांचे आयोजन मुंबई आणि मुंबईनजीकच्या स्टेडियममध्ये करण्यात येणार आहे. मुंबई आणि नजीकच्या परिसरात बरेच स्टेडियम असल्याने बीसीसीआयने मुंबईत साखळी सामने खेळवण्यास पसंती दिली आहे. मुंबईतील वानखेडे, बेब्रॉन स्टेडियम, नवी मुंबईतील डी वाय पाटील स्टेडियम तर पुण्यातील गहुंजे स्टेडियममध्ये हे साखळी सामने खेळले जाणार आहेत अशी माहित टीओआय ने जारी केली आहे.

डियन प्रीमियर लीगच्या 14 व्या हंगामाची सर्व संघांकडून जय्यत तयारी सुरू झाली आहे. आयपीएल ही क्रिकेटमधील सर्वोत्तम स्पर्धा असल्याने जगभरातील जवळजवळ सर्वच प्रमुख देशातील खेळाडू या स्पर्धेत सहभाग घेत असतात. या सर्वांमध्ये ऑस्ट्रेलियन स्टार्समुळे स्पर्धेची चमक आणखीनच वाढते. अशातच ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाने खेळाडूंना देण्यात येणाऱ्या ना हरकत प्रमाणपत्र (नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट किंवा एनओसी) बाबत महत्त्वाचे वक्तव्य केले आहे.

ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाने स्पष्ट केले की, ते खेळाडूंना परिस्थिती लक्षात घेऊन एनओसी प्रमाणपत्र जाहीर करतील. ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाकडून हे वक्तव्य दक्षिण आफ्रिका दौरा रद्द केल्यानंतर आले आहे. ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाद्वारे निक हॉकले म्हणाले, ‘आयपीएलने मागील वर्षी बायो-बबल निर्माण केले होते. यावर्षी आमच्याकडे अर्ज आल्यानंतर आम्ही पूर्ण विचार करून निर्णय घेऊ.’ एकंदरीतच तर्क लावला जात आहे की, जर खेळाडूंना दुखापत नसेल तर त्यांना एनओसी दिला जाईल.

महत्वच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!