चेन्नई : येत्या ५ फेब्रुवारीपासून इंग्लंड संघाविरुद्ध कसोटी मालिका खेळणार आहे. ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध झालेल्या कसोटी मालिकेत विराट कोहली याने पहिल्या सामन्यानंतर पालकत्त्व रजा घेतली होती. कोहलीच्या जागी रहाणेने भारतीय संघाची धुरा सांभाळली होती. परंतु विराट आता संघात परतला आहे. विलगीकरण काळानंतर भारतीय संघ मंगळवार २ फेब्रुवारी पासून मैदानात सरावासाठी उतरला आहे.
आगामी मालिकेत कर्णधार विराट कोहली परत आल्याने पुन्हा आपली उपकर्णधाराची जबाबदारी सांभाळण्यास कसलीही हरकत नाही. कोहलीने ऑस्ट्रेलियाविरुद्ध फक्त पहिला कसोटी सामना खेळला होता. त्यानंतर पालकत्त्व रजेमुळे तो भारतात परतला होता. त्यामुळेच रहाणे ऑस्ट्रेलियात कर्णधाराच्या भूमिकेत होता असे त्याचे म्हणणे आहे.
रहाणेने बुधवारी व्हर्च्युअल पत्रकार परिषदेमध्ये सांगितले की, ‘विराट कोहली हा भारताचा कर्णधार आहे. कौटुंबिक कारणास्तव तो ऑस्ट्रेलियामधून माघारी परतला होता, म्हणूनच मी कर्णधार झालो. मुळात विराट भारतीय संघाचा कर्णधार आहे आणि मी उपकर्णधार आहे. त्यामुळे तो आमच्याबरोबर परत आला याबद्दल मला खरोखरच आनंद आहे.’
विराटचे पुनरागमन ही बाब भारतीय संघासाठी खरोखरच सकारात्मक असल्याचे देखील रहाणेने सांगितले. तो म्हणाला, ‘एक संघ म्हणून आम्ही एकत्र काम करण्याचा प्रयत्न करीत आहोत. माझे काम हे मागे राहून विराटला मदत करणे हे आहे. मी उपकर्णधार असताना सहसा बॅकसिट घेतो. आपल्या परिस्थितीची योग्य कल्पना घेऊन खेळात काय घडू शकतात? यावर कर्णधाराने तुम्हाला सूचना विचारल्यावर तुम्ही तयार असायला हवे.’
महत्वच्या बातम्या
- शेतकरी आंदोलनावर लता मंगेशकर यांचीही प्रतिक्रिया, म्हणाल्या…
- धक्कादायक! एचआयव्हीबाधीत ५ विद्यार्थ्यांना वर्गाबाहेर काढले; मुख्याध्यापकाकडून आरोपाचे खंडण
- शेतकरी आंदोलनावर क्रिकेटपटूंचे ट्विटस् कसे? काँग्रेस नेता म्हणाला…
- शेतकरी आंदोलनावर सचिन-विराट, रोहितनंतर अनेक क्रिकेटपटूंची प्रतिक्रिया, म्हणाले…
- ‘शाब्बास देवेंद्रजी! आपण सरकारची ‘मन की बात’च जाहीर केली !’


