नागपूर : नवाब मलिक यांच्यासारखे माझे कुठल्याही अंडरवर्ल्ड किंवा दहशतवाद्यांशी संबंध नाही असे म्हणत भाजप नेते मुन्ना यादव यांनी नवाब मलिक यांना प्रत्युत्तर दिले आहे. आज सकाळी नवाब मलिक यांनी मुन्ना यादव यांचं नाव घेत एका गुंडाला माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंडळाचा अध्यक्ष केल्याचा आरोप केला होता. मुन्ना यादव हे कुख्यात गुंड असून त्यांच्या विरोधात अनेक गुन्हे आहेत असा दावाही मलिक यांनी केला होता.
मी गेल्या २५ वर्षांपासून राजकारणात आहे. भाजपचा १० वर्षे नगरसेवक होतो. त्यामुळं माझ्यावर काही राजकीय गुन्हे आहेत. याचा अर्थ मी काही गुंड नाही, असे उत्तर मुन्ना यादवने मलिकांना दिलं. नवाब मलिक माझी बदनामी करत आहेत. त्यांच्याविरोधात मी अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार असल्याचेही ते म्हणाले.
मुन्ना यादव नागपूरचा कुविख्यात गुंड, त्याच्यावर हत्येचे अनेक गुन्हे, तो देवेंद्र फडणवीस यांचा साथी आहे. त्या मुन्ना यादवला कन्स्ट्रक्शन वर्क्स बोर्डाचा सदस्य बनवलं होतं की नाही ते फडणवीसांनी स्पष्ट करावं. तुमच्या गंगेत अंघोळ करून मुन्ना यादव पवित्रं झाला का?, असा सवाल मलिकांनी विचारला होता.
यावर मुन्ना यादव यांनी मालिकांचे सर्व आरोप फेटाळत देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट करण्यासाठी मलिक यांच्याकडे कुठलेही मुद्दे नाहीत. म्हणून ते माझ्या माध्यमातून फडणवीसांना टार्गेट करत आहेत. माझ्या विरोधात असलेल्या राजकीय गुन्ह्यांना नवाब मलिक गुन्हेगारी जगताशी जोडून मला गुंड म्हणत आहे. मी फडणवीस यांच्या जवळचा आहे यात दुमत नाही. फडणवीसांनी ही कधीही मी त्यांचा खास कार्यकर्ता आहे असे नाकारलेले नाही असेही मुन्ना यादव म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘मलिक साहेब, हायड्रोजन सोडा आता तुम्हाला ऑक्सिजनची गरज लागेल’
- भाजपा नेते एसटी कर्मचाऱ्यांना चिथवून गलिच्छ राजकारण करत आहेत-सचिन सावंत
- ‘नवाब मलिक यांचं डोकं ठिकाणावर नाही, त्यांना मानसोपचार तज्ज्ञांची गरज’, दरेकरांचा टोला
- ‘बिगडे नवाब’ म्हणणाऱ्या अमृता फडणवीसांना मलिकांच्या मुलीचं सडेतोड उत्तर
- समीर वानखेडेंच्या औरंगाबादेतील आत्याची मलिकांविरोधात तक्रार, एट्रॉसिटी दाखल करण्याची मागणी


