Share

‘मलिक साहेब, हायड्रोजन सोडा आता तुम्हाला ऑक्सिजनची गरज लागेल’

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : अल्प संख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी आज सकाळी पत्रकार परिषद घेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. दाऊदच्या जवळचा सहकारी रियाझ भाटी याला देवेंद्र फडणवीस यांचा राजाश्रय असल्याचा आरोप मलिक यांनी केला. तर विविध प्रकरणात आरोप असलेल्या मुन्ना यादव, हाजी अराफत आणि हाजी हैदर यांना भाजपने पदे दिली असा आरोपही मलिक यांनी केला. नवाब मलिक यांच्या प्रत्येक आरोपांवर भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी उत्तर देताना आशिष शेलारांनी मलिकांना काळजी घेण्याचा खोचक सल्ला दिला आहे.

हायड्रोजन सोडा आता ऑक्सिजनची गरज लागेल अशी मलिक यांची परिस्थिती आहे, विविध नावे समोर आणून खूप मोठं चित्र उभं करण्याचा प्रयत्न केला, पण ते झालं नाही. हे म्हणजे अकबर बिरबलाच्या गोष्टीतील बिर्याणीसारखं आहे. संपूर्ण राज्याची यंत्रणा लावून सुद्धा फडणवीस यांना लागू शकेल असा आरोप मलिक करू शकले नाहीत, अशी टीका शेलार यांनी केली.

मलिक यांचे मानसिक संतुलन बिघडलं आहे की काय? जावयाच्या प्रेमापोटी नीच पातळीवर जाऊ नका, नवाबी पातळीवर जाऊ नका. राज्यातील अल्पसंख्याक नेतृत्व, कार्यकर्ते यांना नेस्तनाबूत करण्याचे काम मलिक यांच्याकडून होत आहे. आर्यन खान तुमच्यामुळे अडचणीत आला. शाहरुख खानला अडचणीत आणण्याचे काम केले. अशी घणाघाती टीका शेलार यांनी मलिक यांच्यावर केली.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!