🕒 1 min read
मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसाठी विरोधीपक्षातील नेते प्रचंड आक्रमक झाले आहेत. सकाळीच मंत्रालयाकडे जाणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांना पोलिसांनी मानखुर्द चेकपोस्ट येथे अडवल्यानंतर रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी ठिया सुरु केला आहे. याबाबत काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी सुधीर मुनगंटीवार यांचा एक व्हिडीओ ट्विट केला आहे, त्यात मुनगंटीवार म्हणतात, ‘एसटीचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करता येत नाही’.
#भाजपा नेते एस टी कर्मचाऱ्यांना चिथवून गलिच्छ राजकारण करत आहेत. उच्च न्यायालयाने संपावर बंदी घालून समिती गठीत केली व राज्य सरकारने इतर मागण्या मान्य केल्या. मग आंदोलन का?एसटी कर्मचाऱ्यांनी अशा संधीसाधूंना थारा देऊ नये. भाजपाच्या भूमिका कशा बदलतात ते पहा. #महाराष्ट्रद्रोही_भाजपा pic.twitter.com/e9OMStnlso
— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) November 10, 2021
यावरुन सचिन सावंत यांनी भाजपा नेत्यांवर टीका केली आहे. सावंत म्हणाले, भाजपा नेते एसटी कर्मचाऱ्यांना चिथवून गलिच्छ राजकारण करत आहेत. उच्च न्यायालयाने संपावर बंदी घालून समिती गठीत केली व राज्य सरकारने इतर मागण्या मान्य केल्या. मग आंदोलन का? एसटी कर्मचाऱ्यांनी अशा संधीसाधूंना थारा देऊ नये. भाजपाच्या भूमिका कशा बदलतात ते पहा. महाराष्ट्रद्रोही भाजपा. असे सावंत ट्विट करत म्हणाले आहेत.
राज्य परिवहन महामंडळाचे राज्य शासनात विलगीकरण करण्यात यावे या मागणीसाठी गेल्या अनेक दिवसांपासून एसटीचे कर्मचारी संपावर आहेत. एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचे आंदोलन अखेर हायकोर्टात पोहोचले आहे. कर्मचारी आपल्या मागणीवर ठाम आहेत, त्यामुळे आता एसटी कर्मचाऱ्यांनी आज मंत्रालयावर धडक मोर्चा काढला होता. मात्र पोलिसांनी चेकपोस्टवर आंदोलकांना अडवले आहे. त्यामुळे विरोधी पक्षनेते आक्रमक झाले आहेत.
महत्वाच्या बातम्या
- ‘आता बाळासाहेबांच्या स्मृती स्थळावर गोमूत्र शिंपडण्याची वेळ आलीय
- १४ कोटींच्या बनावट नोटांचं प्रकरण फडणवीसांनी दाबलं; मलिकांचा आरोप
- ४० एसटी कर्मचाऱ्यांचा बळी घेतलेले बेशरम सरकार मोर्च्याला सामोरे जाईल का?
- एसटी कर्मचाऱ्यांचा मंत्रालयावर धडक मोर्चा, मात्र पोलिसांकडून अडवणूक
- ‘काल यांचे मंत्री दिसले नाही, एसटी कामगार विचारत होते’, नितेश राणेंचा टोला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
