Share

धक्कादायक! मंदिरात नारळ फोडल्याने लातुरात मागासवर्गीय कुटुंबावर गावाचा बहिष्कार

Published On: 

लातूर: ताडमुगळी गावातील मागासवर्गीय असलेल्या कुटुंबातील तरुणानं गावच्या मंदिरात नारळ फोडला म्हणून बहिष्कार टाकण्यात आल्याची घटना लातुरात घडली आहे. (Village boycott on backward class family in Latur for breaking coconut in temple) तीन दिवसांपासून या कुटुंबावर बहिष्कार असल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान पोलिसांच्या मध्यस्थीनंतर हा बहिष्कार मागे घेण्यात आला आहे.

या घटनेमुळे संताप व्यक्त केला जात आहे. कर्नाटक सीमावर्ती भागाच्या जवळ असलेलं हे गाव या घटनेमुळे एकदमच प्रकाशझोतात आले आहे. तीन दिवसांपूर्वी या गावातील मागासवर्गीय तरुणाने गावातील मंदिरात जाऊन नारळ फोडले होते. यानंतर गावातील लोकांनी या कुटुंबावर बहिष्कार टाकत गावकीत सहभाग नको, किराणा, दळण बंद, शेतातील मजूरीसाठी बोलावणे बंद केले. ही माहिती पोलिसांपर्यंत पोहोचली आणि पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत चर्चा करून प्रकरण मिटवले.

दरम्यान या घटनेमुळे काही संघटना आक्रमक झाल्या असून या प्रकरणातील संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. या घटनेचा व्हिडिओही व्हायरल झाला आहे. आता या प्रकरणाची राज्य सरकारने चौकशी करून अशा समाजकंटाकावर राष्ट्रीय सुरक्षा कायदा लावून अटक करावी, अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खरात)चे अध्यक्ष सचिन खरात यांनी केली आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!