🕒 1 min read
औरंगाबाद : महिलांबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याबद्दल कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदोरीकर यांच्याविरोधात दाखल तक्रार नगर जिल्ह्यातील संगमनेर सत्र न्यायालयाने रद्द केली होती. यानंतर या निकालास तक्रारदारांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात आव्हान दिले आहे. याप्रकरणी खंडपीठाने इंदोरीकर महाराजांना नोटीस बजावली आहे. पुढील सुनावणी एका आठवड्यानंतर होत आहे.
काय म्हणाले होते इंदोरीकर महाराज ?
स्त्रीसंग सम तिथीला झाला तर मुलगा होतो, विषम तिथीला झाला तर मुलगी होते आणि स्त्रीसंग जर अशीव वेळेला झाला तर ती रांगडी, बेवडी आणि खानदान मातीत मिळवणारी होतात. जर टाईमिंग हुकला की क्वालिटी खराब, अशी विधाने इंदोरीकर महाराज यांनी आपल्या कीर्तनात केली होती. त्यांच्या या वक्तव्यावर आक्षेप घेत अहमदनगरच्या PCPNDT समितीने ही नोटीस पाठवली होती.
काय झाले होते पूर्वी?
इंदोरीकर महाराज यांच्या या वक्तव्यावर आक्षेप घेत त्यांच्यावर पीसीपीएनडीटी कायद्याच्या कलम २२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांनी यासंदर्भात प्रोसेस इशू केली होती याविरोधात इंदुरीकर महाराजांनी अहमदनगर जिल्हा सत्र न्यायालयात धाव घेतली होती. सत्र न्यायालयाने प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांचे आदेश रद्द केले होते.
सत्र न्यायालयाच्या निकालाविरोधात याचिकाकर्त्या रंजना गवांदे यांनी वकील जितेंद्र पाटील व नेहा कांबळे यांच्या वतीने औरंगाबाद खंडपीठात याचिका सादर केली. यावर खंडपीठाने इंदोरीकर महाराज व अहमदनगरचे जिल्हा शल्यचिकित्सक यांच्या नावे नोटीस काढली आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘कर्ज फेडण्यासाठी छोट्या कर्जदारांना जास्त वेळ द्या’, आरबीआयचे बँकांना निर्देश
- ‘कोरोना लढ्यासाठी विदेशातून आलेल्या निधीचे काय झाले?’, राहुल गांधींचा मोदींना सवाल
- सुत्रे हाती घेताच ममतांकडून बंगालमध्ये कठोर निर्बंध
- ‘आरक्षण नाही, भाषेला अभिजात दर्जा नाही, मायभूमीत म्हणावा तसा टक्का नाही’ : केदार शिंदे
- पोलिसांनी चक्क रुग्णालयातील कर्मचारी व अधिकाऱ्यांना केली मारहाण!
- बीडमध्ये १ हजार ४३९ कोरोना रुग्णांची वाढ तर १ हजार १४० जणांनी केली कोरोनावर मात
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
