Share

पाकिस्तानला चपराक! काश्मीरप्रश्नी भारत-पाकने चर्चेतून तोडगा काढावा, संयुक्त राष्ट्राचे आवाहन

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली : नेहमी आंतरराष्ट्रीय पातळीवर काश्मीरचा राग आळवून रडगाणे गाणाऱ्या पाकिस्तानाला जोरदार चपराक मिळाली आहे. संयुक्त राष्ट्र महासभेचे अध्यक्ष वोलकन बोजकीर यांनी जम्मू-काश्मीर प्रश्नावर सिमला कराराची आठवण करून दिली आहे. काश्मीरच्या मुद्द्यावर दोन्ही देशांनी शांततच्या मार्गाने तोडगा काढवा, असे आवाहन त्यांनी केले. दरम्यान, कोरोनाच्या वाढत्या थैमानामुळे बोजकीर यांनी आपला प्रस्तावित भारत दौरा रद्द केला आहे.

महासभेचे अध्यक्ष बोजकीर यांनी काश्मीर प्रश्न चर्चेतून सोडविण्यावर भर देण्याची गरज व्यक्त केली. मंगळवारी पत्रकार परिषदेदरम्यान काश्मीरसंदर्भात विचारण्यात आलेल्या प्रश्नाचे उत्तर देताना बोजकीर म्हणाले की, जम्मू-काश्मीरवर संयुक्त राष्ट्राची भूमिका ही यूएन चार्टर आणि सुरक्षा परिषदेच्या प्रस्तावानुसार निश्चित होत असते. त्यामुळे हा प्रश्न दोन्ही देशांनी चर्चेने सोडवला पाहिजे.

भारत आणि पाकिस्तान दरम्यान १९७२ साली झालेल्या सिमला करारनुसार जम्मू-काश्मीरची अंतिम स्थिती ही संयुक्त राष्ट्राच्या चार्टरनुसार शांततापूर्ण पद्घतीने निश्चित होईल. जम्मू-काश्मीरच्या मुद्दावर प्रभाव पडेल असे पाऊल कोणत्याही पक्षाने उचलू नये, असेही बोजकीर म्हणाले. सामन्यत: काश्मीर प्रश्नावर चर्चा आणि धोरणात्मक पातळीवर तोडगा निघावा अशी माझी भूमिका आहे. त्यामुळे भारत व पाकिस्ताने हा मुद्दा शांततेच्या मार्गाने सोडावावा, असे आवाहन त्यांनी केली.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!