Share

बीडकरांचे डोळे आसुसले रेमेडेसिवीरसाठी

Published On: 

बीड: कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे जिल्हा पूर्ण हादरला आहे. एकीकडे रुग्ण तर दुसरीकडे वैद्यकीय सुविधांचा तुटवडा अशा बिकट परिस्थिती सध्या बीडमध्ये बघायला मिळत आहे. कोरोनाशी लढणाऱ्या रुग्णांना रेमेडेसिवीरची गरज आहे मात्र अजूनही रेमेडेसिवीर इंजेक्शन उपलब्ध होऊ शकले नाहीये. रविवार आणि सोमवार असे दोन्ही दिवस इंजेक्शन उपलब्ध नाही झाले. तसेच रुग्णांच्या नातेवाईकांची देखील इंजेक्शनच्या नोंदणीसाठी दिवस रात्र थांबावे लागत आहे.

शहरात सोमवारी संध्याकाळपर्यंत एकूण ३०० अर्ज जिल्हा प्रशासनाकडे आले आहेत मात्र तुटवड्यामुळे एकही इंजेक्शन मिळू शकलेले नाही. या इंजेक्शनसाठी नातेवाइकांच्या होणाऱ्या रांगा थांबवण्यासाठी खुद्द पालकमंत्र्यांनी जिल्हा प्रशासनाला सूचना देत प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी व्यवस्था करण्याच्या सूचना दिल्या, परंतु सोमवारी पहिल्याच दिवशी बीडसह अन्य दहा तालुक्यांत हे इंजेक्शन उपलब्ध होऊ शकले नाही. आता अन्न औषध निरीक्षकांनी मंगळवारी सकाळपर्यंत ९६ इंजेक्शन येतील, असे सांगितले आहे.

रेमडेसिविर इंजेक्शनसाठी बीडमधील रांगा आणी रुग्णांच्या नातेवाइकांची होणारी धावपळ थांबवण्यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी जिल्हा प्रशासनाला सूचना करत प्रत्येक तालुक्याच्या कार्यक्षेत्रातील खासगी कोविड हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णांना जर त्यांचे फिजिशियनकडून रेमडेसिविर इंजेक्शन देणे आवश्यक असल्याची शिफारस केली असेल तर अशांची यादी तयार करून ती यादी ईमेलवर जिल्हाधिकारी कार्यालयास पाठवण्याचे आदेश जिल्ह्यातील तहसीलदारांना देण्यात आले. प्रत्येक तालुक्याचे तहसीलदार आणि मेडिकल सुपरिंटेंडेंट यांना सदरील इंजेक्शनचा पुरवठा करावा लागणार आहे. सोमवारपासून प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी हे इंजेक्शन ज्या त्या हॉस्पिटलमध्ये मिळणार असल्याचे सांगण्यात आले. कोरोनाबाधित रुग्णांच्या नातेवाइकांनी प्रत्येक तहसील कार्यालयात इंजेक्शनच्या मागणीची नोंदही केली. परंतु दिवसभर एकही इंजेक्शन त्यांना मिळू शकले नाही. सोमवारी बीड शहरातही हीच परिस्थिती राहिली.

बीड शहरातून याच इंजेक्शनसाठी जवळपास तीनशे अर्ज आलेले असून सोमवारी कोणालाच इंजेक्शन मिळु शकले नाही. आम्ही बीड येथील औषध निरीक्षक रामेश्वर डोईफोडे यांच्याशी संपर्क साधून सोमवारी दिवसभर का इंजेक्शन येऊ शकले नाहीत याची माहिती घेतली असता त्यांनी सांगीतले की, कंपनीकडूनच डेपोला या इन्जेक्शनचा पुरवठा नसून डेपोकडून होलसेल विक्रेत्यांकडे इंजेक्शन आलेले नाहीत. त्यामुळे तुटवडा असून दररोज दीड हजार इंजेक्शनची मागणी असताना केवळ शंभर इंजेक्शन येत आहेत. बीड येथील खासगी मेडिकल व एजन्सीने कंपनीकडे १५ हजार रेमडेसिविर इंजेक्शनची मागणी करून पैसेही पाठवले आहेत, परंतु हे इंजेक्शन तुटवड्याअभावी उपलब्ध झालेले नाहीत. मंगळवारी सकाळी ९६ इंजेक्शन उपलब्ध होतील. दिवसभरात एकूण दीडशे इंजेक्शन उपलब्ध होण्याची शक्यता असल्याचे डोईफोडे यांनी सांगितले. त्यामुळे बीड जिल्ह्यातील नागरिकांना थोडा का होईना दिलासा मिळणार आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!