Share

धक्कादायक! औरंगाबादेत एकही व्हेंटिलेटर बेड शिल्लक नाही

Published On: 

औरंगाबाद : औरंगाबाद शहरात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. कुठे रुग्णांना बेड मिळत नाही तर कुठे ऑक्सिजनची सुविधादेखील नाही. मात्र सद्यस्थितीत शहरात एकही व्हेंटिलेटर बेड शिल्लक नसल्याची धक्कादायक परिस्थिती निर्माण झाली आहे. या परिस्थितीला जबाबदार कोण असा सवाल सर्वत्र उपस्थित होत आहे.

दररोज कोरोना रुग्णांची संख्या वाढत नसली तरी रुग्ण गंभीर होण्याचे प्रमाण प्रचंड वाढत चालले आहे. त्यामुळे आरोग्य सुविधा अपूरी पडत आहे. आजघडीला शहरात २३५ व्हेंटिलेटर बेडपैकी एकही बेड शिल्लक नसल्याची धक्कादायक माहिती मंगळवारी (दि.१९) समोर आली. खाजगी रुग्णालयात एक बेड सकाळी शिल्लक होता मात्र आता तोही भरला गेला आहे.

व्हेंटिलेटरचा एकही बेड शिल्लक राहिलेला नसून अशा परिस्थितीत रुग्णाची प्रकृती गंभीर झाल्यास त्यास व्हेंटिलेटर मिळण्याची कोणतीही शक्यता नाही. त्यामुळे आरोग्य सुविधांची कमतरता लक्षात घेऊन नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडून कोरोना संसर्गाच्या विळख्यात सापडू नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. तसेच Outside O2 ४२५ बेड शिल्लक आहेत. मात्र याठिकाणी मोठ्या प्रमाणावर ऑक्सिजनची कमतरता आहे.

औरंगाबाद शहरात कोरोना संसर्गाचा उद्रेक झाला असून बाधित रुग्णांची संख्या देखील वाढत चालली आहे. कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी शहरात १३ मोठे रुग्णालये (डीएचसी), ५६ डीसीएचसी आणि १७ कोविड केअर सेंटर्स आहेत. यामध्ये एकूण बेड्सची संख्या ७ हजार ८२६ इतकी असून त्यामध्ये व्हेंटिलेटरचे २३५ बेड्स, आयसीयूचे ६६४ बेड्स, नॉन आयसीयूचे २१७९ बेड्स आणि आयसोलेशनचे ४७४८ बेड्स आहेत. त्यापैकी व्हेंटिलेटरचे २३५, आयसीयूचे ६१२ नॉन आयसीयूचे १७४० आणि आयसोलेशनचे २८१२ बेड रुग्णांनी व्यापले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!