उस्मानाबाद: एकीकडे कोरोना महामारीमुळे नागरिक त्रस्त असताना काही अनुचित प्रकार घडत आहेत. अशीच एक दुर्दैवी घटना आहे, घरातील गॅस सिलेंडरचा भीषण स्फोट होवून एक जण गंभीर जखमी झाला. तर पाच जण किरकोळ जखमी झाले. ही घटना मुरूम येथे रविवारी घडली आहे. स्फोट झाल्यानंतर आग लागली लागल्याने अग्नीशामक दलाने ही आग विझवली.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, मुरूम येथे रविवारी सायंकाळी साडेचार ते पाच वाजण्याच्या सुमारास घरातील संपलेला गॅस सिलेंडर बदलून दुसरे सिलेंडर लावत असताना सिलेंडरचा स्फोट झाला. यामध्ये राजू साठे गंभीर जखमी झाले आहेत. राजू साठे यांना पुढील उपचारासाठी उमरगा येथे नेण्यात आले आहे. इतर ५ व्यक्ती हे किरकोळ जखमी झाले आहेत. त्यात पृथ्वीराज मोरे, माया युवराज पाटील, छाया गजेंद्र साठे, रेखा गजेंद्र साठे, सुमित्रा अशोक सूर्यवंशी या किरकोळ जखमी झाले आहेत.
या स्फोटाने घरावरील पत्रे व त्यावरील लाकडे आगीत जळाली. घरी काही दिवसांवर लग्न समारंभ असल्याने बस्ता ही बांधून ठेवण्यात आला होता. सदरील स्फोटाने जवळपास ३० ते ४० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. घटनास्थळी मुरूम नगर परिषद अग्निशमन दलाचे पथक दाखल होऊन आग आटोक्यात आणली. नुकसानग्रस्त कुटूंबाला शासनाने मदत करून दिलासा द्यावा, अशी मागणी ग्रामस्थांमधून करण्यात येत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- मृत्यूनंतरही यातना संपेना! अंत्यविधीच्या प्रक्रियेत नातेवाईकांची फरफट
- १८ वर्षांवरील सर्वांना कोरोना लस, जाणून घ्या लस घेण्याची प्रक्रिया
- ‘लस घेतलेल्या वारकऱ्यांना चैत्री वारीसाठी परवानगी द्या’, कीर्तनकार महासंघाची मागणी
- ‘नवाब मलिकांनी आता तरी तोंड काळे करावे’, भाजपच्या अतुल भातकळकरांचे आव्हान
- धक्कादायक! नऊ महिन्यांत महाराष्ट्रात १०२ पत्रकारांचा कोरोनाने मृत्यू
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

