Share

गरज नसतांना सिटिस्कॅन कराल तर खबरदार! खासगी रुग्णालयांना पांडेयजींचा इशारा

Published On: 

औरंगाबाद : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत दिवसेंदिवस गंभीर रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे खासगी रुग्णालयांनी सिटिस्कॅन चाचण्यांद्वारे आपला धंदा जोरात सुरु केला आहे. गरज नसतांनाही अनेकांना सिटिस्कॅन तपासणी सांगत जास्तीचे शुल्क वसूल केले जात आहे. त्यामुळे महापालिकेने शासन निर्देशांनुसार खासगी रुग्णालये किंवा सिटीस्कॅन तपासणी केंद्रांना सिटीस्कॅन चाचणीचे दर निश्चित करून दिले आहे. यापेक्षा जास्त दराने आकारणी केल्यास संबंधित खासगी रुग्णालयासह सिटीस्कॅन तपासणी केंद्रावर थेट कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशाराही दिला आहे.

पालिका प्रशासक तथा आयुक्‍त आस्तिककुमार पांडेय यांनी यासंबंधीचे आदेश जारी केले आहे. शहरात कोरोना संसर्गाचा उद्रेक वाढला असून दररोज आठशे ते हजार रुग्ण आढळून येत आहेत. यातील बहुतांश रुग्ण हे ५० वर्षापेक्षा जास्त वयाचे आहे. त्यामुळे उपचार घेतांना खासगी रुग्णालयाकडून सिटीस्कॅन करण्याची सक्ती केली जात आहे. सिटीस्कॅनद्वारे रुग्णांचा एचआरसीटी स्कोर तपासून त्यांच्यावर उपचार केले जात आहे. वास्तविक एचआरसीटी करण्याची आवश्यकता नसल्याचे केंद्रीय पथकाने नुकतेच पाहणीत स्पष्ट केले आहे.

मात्र खासगी रुग्णालये किंवा सिटीस्कॅन तपासणी केंद्रांमधून रुग्णांची एचआरसीटीसाठी रुग्णांची लुट केली जात असल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. या तक्रारीची दखल घेऊन महापालिकेने केंद्रीय पथकाच्या सूचनेनुसार खासगी सिटीस्कॅन केंद्रांसाठी एचआरसीटीचे दर निश्चित करून दिले आहे. निश्चित दरापेक्षा जास्त आकारणी केल्यास संबंधितांवर साथरोग कायदा १८९७, आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५, मेस्मा अ‍ॅक्ट २०११, द मुंबई नर्सिंग होम अ‍ॅक्ट २००६, अ बॉम्बे पब्लीक ट्रस्ट अ‍ॅक्ट १९५० नुसार कायद्यातील तरतूदीनुसार कारवाई केली जाईल, असा इशारा दिला आहे.

नोंदणीकृत डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शन शिवाय ही तपासणी करू नये, एचआरसीटी-चेस्ट तपासणी करणार्‍या रेडिओलॉजिस्टने संपूर्ण तपासणी अहवाल देणे आवश्यक आहे. विमा योजना किंवा रुग्णालयाने किंवा कॉर्पोरेट खासगी आस्थापनाने जर एचआरसीटी चेस्ट तपासणी केंद्राशी सामंजस्य करार केलेला असेल तर त्यासाठी हे दर लागू राहणार नाही. तपासणीसाठी निश्चित केलेले दर खासगी रुग्णालये किंवा सिटीस्कॅन तपासणी केंद्रांच्या दर्शनी भागात लावावे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!