Share

दिल्ली आंदोलन; दुसऱ्यांना त्रास देऊ नका, कोर्टाने शेतकऱ्यांना सुनावले

Published On: 

नवी दिल्ली : दिल्ली येथे कृषी कायद्याविरोधात गेल्या अनेक दिवसांपासून शेतकरी आंदोलन सुरू आहे. शेतकऱ्यांनी आंदोलनादरम्यान दिल्लीच्या सीमा बंद केल्यात. शेतकरी आंदोलनामुळे दिल्ली सीमा बंद झाल्याने लोकांना होणाऱ्या अडचणींसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने कडक टिप्पणी केली.

नोएडातील मोनिका अग्रवाल यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत म्हटले आहे की, कामानिमित्त त्यांना वारंवार दिल्लीला यावे लागते. आधी ते नोएडाहून २० मिनिटात दिल्लीला यायच्या. पण शेतकरी आंदोलनामुळे गाझीपूर सीमेवर रस्ता बंद आहे. यामुळे आता त्यांना दिल्ली यायला दोन तास लागतात. हीच स्थिती सिंघू आणि टिकरी सीमेवरही आहे.

यावर न्या. संजय किशन कौल आणि न्या. हेमंत गुप्ता यांच्या पीठाने सांगितले की, नागरिक अनेक दिवसांपासून रस्त्यावर बसले आहेत. एखाद्याला तेथे गाव वसवायचे असेल तर वसवा. पण दुसऱ्यांच्या आयुष्यात बाधा आणू नका. सरकारलाही याबाबत काहीतरी करायला हवे. यावर केंद्र सरकारकडून सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सांगितले की, वाद सोडवण्याचा सरकार प्रयत्न करत आहे. केंद्राच्या विनंतीवरून न्यायालयाने सुनावणी ७ मे पर्यंत स्थगित केली.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!