नवी दिल्ली : काही दिवसांपूर्वी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ११ राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला होता. यावेळी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि पंतप्रधान मोदी यांच्यात सुरू असलेल्या चर्चेचे टीव्हीवर लाईव्ह प्रक्षेपण होत असल्याने मोदी नाराज झाल्याचे पाहायला मिळाले. याबद्दल मोदींनी ऑनलाईन बैठकीतच केजरीवालांना फटकारले होते.‘मुख्यमंत्री अशा अंतर्गत बैठकीचं लाईव्ह प्रक्षेपण करणं आपली परंपरा आणि प्रोटोकॉलच्या विरोधात आहे. हे योग्य नाही. आपल्याला नेहमी याचं पालन केलं पाहिजे’, अशी तंबी मोदींनी मुख्यमंत्री केजरीवालांना दिली होती.
तेव्हापासून अनेक मुख्यमंत्री मोदींसोबत काय चर्चा झाली याची केवळ सकारात्मक माहिती माध्यमांना देत होते. पण झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी आता मोदींना थेट आव्हान दिले आहे. सोरेन यांनी पंतप्रधान मोदींसोबत कोरोना परिस्थितीवर चर्चा केली. पण या संवादात काय घडले ते सोरेन यांनी ट्विटद्वारे सांगितले आहे.
‘आज आदरणीय पंतप्रधानांनी फोन केला. यावेळी त्यांनी फक्त त्यांची मन की बात केली. त्यापेक्षा त्यांनी कामाची गोष्ट केली असती आणि कामाचं ऐकलं असतं तर फार बरं झालं असतं’, असा टोला हेमंत सोरेन यांनी ट्विटमधून लगावला आहे.
आज आदरणीय प्रधानमंत्री जी ने फोन किया। उन्होंने सिर्फ अपने मन की बात की। बेहतर होता यदि वो काम की बात करते और काम की बात सुनते।
— Hemant Soren (@HemantSorenJMM) May 6, 2021
झारखंडमध्ये कोरोनाचं संकट निर्माण झालेलं असतानाही केंद्राकडून काहीच मदत झाली नसल्याचा आरोप सोरेन यांनी केला आहे. आरोग्य सचिव अरुण सिंह यांच्या मते, राज्याला केवळ 2181 रेमडेसिवीर इंजेक्शन मिळाले आहेत. झारखंड सरकार बांगलादेशाकडून ५० हजार इंजेक्शन्स मागवण्यास उत्सूक आहे. पण याला केंद्राने अद्याप मंजुरी दिली नाही. झारखंडमध्ये अद्याप १८ वर्षांवरील युवकांचं लसीकरण सुरू करण्यात आलेलं नाही.
महत्वाच्या बातम्या
- ‘संजय काकडेंवर आता तुरुंगात जायची वेळ आलीये’, ‘त्या’ वक्तव्यावर नवाब मलिक संतापले
- ‘कोरोनाशी लढण्यासाठी सर्व पक्षांनी एकत्र यावे, एकट्या मोदींना ते अशक्य’, नवाब मलिकांचा टोला
- ‘मोदीसाहेब, बंगालच्या पराभवाचा राग पेट्रोल डिझेलवर का काढताय?’, रुपाली चाकणकरांचा टोला
- औरंगाबादेत हेल्मेट सक्ती प्रकरण, हायकोर्टाकडून पोलिसांची खरडपट्टी
- निवडणूक संपल्याचा परिणाम; सलग तिसऱ्या दिवशी इंधन दरवाढ
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

