Share

‘मोदीसाहेब, बंगालच्या पराभवाचा राग पेट्रोल डिझेलवर का काढताय?’, रुपाली चाकणकरांचा टोला

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : पाच राज्यांतील विधानसभा निवडणूक संपताच देशात पुन्हा एकदा पेट्रोल-डिझेलचे दर वाढण्यास सुरुवात झाली. गुरुवारी सलग तिसऱ्या दिवशी पेट्रोल २५ पैसे प्रतिलिटर आणि डिझेल ३० पैसे प्रतिलिटर महाग झाले. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्या रुपाली चाकणकर यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.

‘दर महिन्याला भारतात निवडणुका असत्या तर किती बरं झालं असतं…. काही नाही निदान पेट्रोल डिझेलचे भाव तरी स्थिर राहिले असते. पाच राज्यांच्या निवडणुक निकालापासून आजची सलग चौथ्या दिवशी भाववाढ!! सन्माननीय पंतप्रधान मोदीसाहेब, बंगाल मधील पराभवाचा राग पेट्रोल डिझेलवर का काढताय??’ असा टोला लगावत चाकणकर यांनी केंद्र सरकारवर टीका केलीय.

निवडणूक आयोगाने २६ फेब्रुवारीला पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीची घोषणा केली होती. त्यानंतर २७ फेब्रुवारीला पेट्रोल-डिझेलची दरवाढ झाली होती. नंतर ३ मेपर्यंत दरवाढ झाली नाही. २४ मार्च, ३० मार्च आणि १५ एप्रिलला दरात किरकोळ कपात झाली होती. २ मे रोजी निवडणूक निकाल आल्यानंतर फक्त एक दिवस दिलासा मिळाला. ४ मेपासून पुन्हा पेट्रोल-डिझेलचे दर वाढत आहेत. गेल्या तीन दिवसांत झालेल्या बदलांत पेट्रोलचे दर ५९ पैसे आणि डिझेलचे दर ६९ पैसे प्रतिलिटर असे वाढले आहेत.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!