औरंगाबाद : गेल्या तीन दिवसांपासून औरंगाबाद शहरात हेल्मेट सक्तीचे प्रकरण गाजत आहे. पण हेल्मेट सक्तीबाबत अतिशय स्पष्ट शब्दांत दिलेल्या आदेशाचा भंग केल्यामुळे औरंगाबादच्या वाहतूक शाखेचे सहायक पोलीस आयुक्त सुरेश वानखेडे यांनी लेखी माफी मागावी, असे आदेश औरंगाबाद खंडपीठाने दिलेत. आदेशाचे पालन न केल्याने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त करत पोलिसांची खरडपट्टी काढली.
औरंगाबाद खंडपीठात कोरोना रुग्णांवर उपचारासाठी आवश्यक वैद्यकीय सोयीसुविधांबाबत सुमोटो याचिकेवर ऑनलाइन सुनावणी सुरू आहे. त्यात ३ मे रोजी खंडपीठाने हेल्मेट सक्ती करण्याचे आदेश दिले. औरंगाबादेत हेल्मेट आणि मास्क घालण्याबाबत तसेच आधार कार्ड सोबत ठेवण्याबाबत खंडपीठाने आदेश दिले होते. पण याची योग्यरित्या अंमलबजावणी होत नाही, असे निरीक्षण कोर्टाने नोंदवले. यासंदर्भात किती गुन्हे दाखल केले, याचीही माहिती मागवली होती.
त्याची दखल घेत सहायक पोलीस आयुक्त वानखेडे यांनी ४ मे रोजी एक प्रसिद्धिपत्रक काढले. त्यात म्हटले होते की, हेल्मेट नसलेल्या दुचाकीस्वारांवर कारवाईची मोहीम ५ मेपासून सुरू करण्यात येणार आहे. पण, नागरिकांच्या विरोधानंतर काही वेळातच ५ ऐवजी १६ मेपासून राबवण्यात येईल, असे जाहीर केले. त्याच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे कालच खंडपीठाने याची गंभीर दखल घेतली. आणि आदेशाचा भंग केल्याबद्दल वानखेडे यांनी स्वत: ७ मे रोजी लेखी माफी मागावी, असे आदेश दिलेत. आता आज या प्रकरणावर काय सुनावणी होणार याकडे लक्ष लागले आहे.
महत्वाच्या बातम्या
- निवडणूक संपल्याचा परिणाम; सलग तिसऱ्या दिवशी इंधन दरवाढ
- ‘कोरोना लसीकरणाची गती कमी होऊ देऊ नका’, पंतप्रधान मोदींचे राज्यांना आवाहन
- रेमडेसिवीर इंजेक्शन गरिबांना सरकारी शुल्कात, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची माहिती
- ‘पुतळ्यांसाठी २० हजार कोटी आहेत, मग लसीकरणाला ३० हजार कोटी नाहीत का?’
- बंगाल हिंसाचाराचा निषेध अंगलट, बीडमध्ये प्रवीण दरेकरांवर गुन्हा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
