Share

आभाळ कोसळलं ! लग्नानंतर पाच दिवसातच कोरोनाने पतीला हिरावलं…

Published On: 

भुवनेश्वर : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशात थैमान घातले आहे. देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा दोन कोटींवर पोहोचला आहे. आतापर्यंत दोन लाखांहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. अनेकांचे जीव या विषाणूने घेतले आहेत. कित्येकांचे कुटुंब उधवस्त झाले आहेत. अशीच भुवनेश्वर येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील एका लग्न समारंभात नियम न पाळल्याने मोठ्या प्रमाणात संसर्ग झाला आणि पाच दिवसांतच नवरदेवाचा मृत्यू झाला. त्यामुळे लग्नसमारंभाला हजेरी लावलेल्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

ओडिशातील केंद्रपाडा जिल्ह्यात एका २६ वर्षीय तरुणाला लग्नानंतर अवघ्या पाच दिवसांत जीव गमवावा लागला आहे. त्याचा कोरोनाने मृत्यू झाल्यानंतर गावात एकच खळबळ उडाली आहे. या लग्नसोहळ्याला अनेक लोक उपस्थित होते. यावेळी फिजीकल डिस्टन्सिंग पाळला नसल्याचे समोर आले आहे. या लग्नाला हजेरी लावलेल्या सर्वांचा शोध आता प्रशासन घेत असून त्यांची चाचणी केली जात आहे.

राजकनिका पोलिस स्टेशनअंतर्गत येणाऱ्या दुर्गादेवी पाडा गावात राहणाऱ्या संजय कुमार नायक याचा विवाह ११ मे रोजी पार पडला होता. तो आपल्या विवाहासाठी बेगलोरला आला होता. त्यावेळी त्याला ताप आणि कोविडची इतर लक्षणं जाणवत होती. विवाहानंतर लगेचच प्रकृती बिघडल्याने त्याची कोरोना चाचणी करण्यात आली. १३ मे रोजी करण्यात आलेल्या चाचणीत तो पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले होते. नवरदेवाचा मृत्यूनंतर गावात एकच खळबळ उडाली आहे.

या तरुणाला घरीच क्वारंटाईन केले होते मात्र, त्याची प्रकृती बिघडल्याने त्याला भुवनेश्वरच्या एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. १५ मे रोजी त्याचा कोरोनामुळे मृत्यू झाला. लग्न सोहळ्यातील सर्वांचा शोध प्रशासन घेत आहे. नवरदेवाच्या घरातील सर्वांचे नमुने घेतले असून अहवालाची प्रतीक्षा आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!