नांदेड : नांदेडमध्ये राज्य परिवहन महामंडळाच्या बस वाहकाने बसमध्येच आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. संजय जानकर (५४) असे या कर्मचाऱ्याचे नाव आहे. बसमधील वाजवण्याच्या दोरीनेच त्यांनी गळफास घेऊन जीवन संपवले. नोकरीवरून काढून टाकण्याच्या भीतीने त्यांनी हे पाऊल उचलल्याचे समजतेय.
संजय जानकर हे नांदेडमधील माहूर आगारात कार्यरत होते. त्यांच्याजवळील तिकीटामध्ये मोठी तफावत आढळली होती. त्यामुळे कामावरुन आपल्याला काढलं जाईल या भीतीने त्यांनी आत्महत्या केली. जानकर यांनी चार पानांच्या आपल्या सुसाईड नोटमध्ये परिवहन मंडळाला जबाबदार धरले आहे.
तिकीट काढण्याचे मशीन सतत बिघडते. त्यामुळे तिकीटांमध्ये तफावत आढळून आली आहे. काही चूक नसताना निलंबन होऊन समाजात बदनामी होईल या भीतीपोटी त्यांनी आत्महत्या केली. एसटी महामंडळमधील नवीन तिकीट मशीन नादुरुस्त आणि बिघडलेल्या आहेत. यामुळे वाहकांना नाहक त्रास होऊन बडतर्फ केलं जात असल्याचा आरोप संजय जानकर यांनी सुसाईड नोटमध्ये केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘पूजाची बदनामी थांबवा नाही अन्यथा आत्महत्या करेल’, वडिलांची उद्विग्न प्रतिक्रिया
- खाकीतील सौंदर्यवती! उपनिरीक्षक पल्लवी जाधवच्या डोक्यावर मिस इंडियाचा ताज
- महत्त्वाचे! पूजा चव्हाण प्रकरणी पहिला खासगी खटला दाखल
- धनंजय मुंडेकडून बीडची पालिका ‘टार्गेट’, नगराध्यक्षांची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार
- ‘बदनामी करू नका, अन्यथा आम्हालाही जीव द्यावा लागेल’, पूजाच्या बहिणीचे भावनिक आवाहन
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
