नंदूरबार : राजकारणात काम करणाऱ्या सर्व महिला चारित्र्यहिन असतात, असे वक्तव्य एमआयएमचे नंदुरबार जिल्हाध्यक्ष जिशान पठाण यांनी केले आहे. यासंदर्भात पक्षाच्या शहादा शहर महिला प्रमुख शबाना अयाज अली व अन्य महिला कार्यकर्त्यांनी पोलिस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली असून पोलिस प्रशासनाने व पक्षातर्फे जिशान पठाण यांच्यावर त्वरीत कडक कारवाई करण्यात यावी, अन्यथा रस्त्यावर उतरुन तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा शबाना अयाज अली यांनी दिला आहे.
जिशान पठाण यांनी राजकारणातील महिलांसदर्भात केलेले विधान हे अत्यंत लाजिरवाणे आहे. असे विधान करुन त्यांनी महिला वर्गाचा अपमान केला आहे. यामुळे त्यांच्यावर पोलिस प्रशासनाने कडक कारवाई करावी. तसेच पक्ष श्रेष्ठींनीही या विधानाची गंभीर दखल घेवून पक्षांतर्गत कारवाई करावी. अन्यथा महिलांना सोबत घेवून रस्त्यावर उतरुन आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. जिशान पठाण हे चार महिन्यापूर्वीच एमआई एमच्या जिल्हाध्यक्षपदी निवड झाली तेव्हापासून सतत चर्चेत असून पक्षांतर्गत त्यांच्या विरुद्ध आत्ता थेट पोलिस ठाण्यात तक्रार दाखल झाल्यामुळे ते पुन्हां अडचणीत आले आहेत.
दरम्यान, माझ्यावरील आरोप सर्व खोटे व बिगर पुरावेनिशी आहेत. काही लोकांनी पक्षाच्या विरोधात काम केले म्हणून वरीष्ठ पातळीवरून त्याना कारणे दाखवा नोटीस देण्यात आली आहे. त्याचा राग मनात धरून माझ्या विरोधात हे षडयंत्र रचले जात आहे. मी महिलांचा नेहमी आदर करतो अशी सारवासारव जिशान पठाण यांनी केली आहे.
महत्वाच्या बातम्या
- गोसावीच्या बॉडीगार्डचे एनसीबीविरोधात खळबळजनक दावे; एसआयटी मार्फत चौकशीची मलिकांची मागणी
- केपी गोसावीच्या सहकाऱ्याच्या आरोपांवर समीर वानखेडेंचे प्रत्युत्तर; म्हणाले…
- कोचिंग क्लासेसनाही लवकरच परवानगी, गृहमंत्री वळसे पाटलांचे आश्वासन
- ‘गांजा फुंकणाऱ्या लोकांबद्दल सहानुभूती असलेले ‘हे’…’; सदाभाऊ खोतांचा परीक्षा गोंधळावर संताप
- मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या निवडणुकीसाठी मैदानात उतरले शरद पवार, परंतु…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
