वाल्हे : पुरंदर तालुक्यातील वाल्हे या गावामध्ये आज सकाळी एक धक्कादायक घटना घडली आहे. इयत्ता नववी मध्ये शिकणाऱ्या आदित्य रवींद्र दोडके (वय १५) या विद्यार्थ्याने गळफास घेऊन आपले जीवन संपवले आहे.
एका नववीत शिकणाऱ्या मुलाने घरचे मोबाईल घेऊन देत नाही म्हणून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना शनिवारी घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आदित्य, आई वडील व आजीकडे मोबाईल घेऊन देण्यासाठी आग्रह करत होता. मात्र, ते मोबाइल घेऊन देण्यास नकार देत होते.
खरंतर ग्रामीण भागामध्ये सध्या लाईट बिल भरण्यासाठी सक्ती केली जात आहे. लाईट बिल नाही भरले तर घरातील वीज पुरवठा खंडित करण्यात येईल असे सांगितले जाते. यामुळेच आदित्य दोडके याच्या आजीने आपण या महिन्यात पहिले लाईट बिल भरू व पुढच्या महिन्यात तुला मोबाईल घेवू असे सांगितले होते. परंतु यामुळे नाराज झालेल्या आदित्यने स्वतःला राहत्या घरी कोंडून घेतले होते.
शनिवारी सकाळी आजीने त्याची समजुत काढत दोन महिन्यांची पेन्शन आली की लाईटबिल भरू आणि तुला मोबाइल विकत घेऊ अशी समजूत काढली. मात्र, रूसलेल्या आदित्यने सकाळीच घरातील एका खोलीचा दरवाजा बंद करुन साडीच्या साह्याने छताला गळफास घेऊन आत्महत्या केली.
ही घटना वाल्हे पोलिस चौकीतील पोलीस संतोष मदने यांना सांगितल्यावर त्यांनी घटना स्थळी भेट दिली. तसेच आदित्यला खाली काढून जेजुरी येथे दवाखान्यात नेण्यात आले. मात्र, त्याला मृत घोषित करण्यात आले. पुढील तपास जेजुरी पोलिस ठाण्याचे प्रभारी सुनिल महाडीक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस संतोष मदने, संदीप मोकशी व केशव जगताप हे करत आहेत.
महत्वाच्या बातम्या
- वीज कनेक्शन तोडणाऱ्यांनी खुर्ची लिलावाची आठवण ठेवा : संभाजी पाटील
- सावधान! ‘या’ रुग्णांची माहिती लपवल्यास होणार २ वर्षांचा कारावास
- आरोग्य विभागात गुणवत्तेलाच प्राधान्य ; आरोग्यमंत्र्यांनी दिला परीक्षार्थींनी धीर
- खाम स्वच्छता मोहीम,नव्या ‘स्मार्ट’ सीईओंची अनुपस्थिती
- जालन्यात कोरोनामुळे चौघांचा मृत्यू; १७१ नव्या बाधित रुग्णांची नो
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
