नवी दिल्ली- देशात सध्या कोरोनामुळे अर्थचक्र थांबले असून अनेक राज्यांची अर्थव्यवस्था यामुळे ढासळत चालली आहे. दिवसेंदिवस बिकट परिस्थिती बनत असताना कोरोना संकटाच्या काळात केंद्र सरकारने राज्यांना मोठा दिलासा दिला आहे.
As a special dispensation, Dept of Expenditure, Finance Ministry at MHA's recommendation has released in advance of the normal schedule the 1st instalment of the Central Share of State Disaster Response Fund (SDRF)for 2021-22 to all States. Rs 8873.6 cr released: Finance Ministry
— ANI (@ANI) May 1, 2021
केंद्र सरकारनं अॅडवान्समध्ये राज्यांना 8873.6 कोटी रुपयांची राज्य आपतकालिन परिस्थितील निधी ((SDRF)) दिला आहे. 2021-22 या आर्थिक वर्षांसाठी आर्थ मंत्रालयानं अॅडव्हान्समध्ये सर्व राज्यांना पहिल्या हप्त्यांच्या रुपानं 8873.6 रुपयांची मदत दिली आहे. ही रक्कम जून महिन्यात दिली जाते. मात्र, सध्याची परिस्थिती पाहाता केंद्र सरकारनं अॅडव्हान्समध्ये रक्कम देण्याचा निर्णय घेतला.
केंद्र सरकारनं दिलेल्या या मदतीमधील 50 टक्के रकम राज्य सरकार कोरोनाच्या या महामारीत वापरु शकते. म्हणजेच, 4436.8 कोटी रुपये कोरोना महामारीविरोधात लढण्यासाठी राज्यांना मिळणार आहेत. या पैशातून ऑक्सिजन निर्मिती, इंफ्रास्ट्रक्चर, लसीकरण, व्हेंटिलीटर, कोविड सेंटर आणि लॅबसारख्या सर्व बाबी करता येतील. मागील वेळी दिलेल्या राशींच्या खर्चाच्या यूटिलाइजेशन सर्टिफिकेट न घेता ही रक्कम केंद्रानं दिली आहे.
दरम्यान, दुसऱ्या बाजूला कोरोना परिस्थितीचा सामना सैन्यदलांना अधिक सक्षमपणे करता येण्यासाठी, संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी विशेष तरतुदींचा वापर करत आज 30 एप्रिल 2021 रोजी त्यांना आपत्कालीन वित्तीय अधिकार प्रदान केले. या अधिकारांमुळे फॉर्मेशन कमांडर्सना विलगीकरण सुविधा / रुग्णालये सुरु करण्यास मदत होईल तसेच विविध सामुग्रीची खरेदी अथवा दुरुस्ती करता येईल.
याशिवाय, या साथरोगाचा सामना करण्यासाठी सध्या सुरु असलेल्या विविध सेवा आणि कार्यांसाठी पुरेशी तरतूदही करता येईल. कोविड-19 ची साथ सुरु झाल्यावर गेल्यावर्षीही सैन्यदलांना आपत्कालीन अधिकार देण्यात आले होते. परिस्थिती जलदगतीने व प्रभावीपणे हाताळण्यासाठी सैन्यदलांना याची मदत झाली होती.
महत्वाच्या बातम्या
- ‘लसीकरणातही मोदी सरकारच्या ढिसाळ कारभाराचे भोग देशाला भोगावे लागत आहेत’
- क्लीन बोल्ड करणाऱ्या नवोदीत हरप्रीत ब्रारला भेटायला गेला कोहली; व्हिडीओ व्हायरल
- ‘अद्यापही बहुतांश दुर्बल घटकांच्या बँक खात्यात जाहीर आर्थिक सहाय्यता निधी जमा झालेला नाही’
- पंजाबकडून रवी बिश्नोईने घेतला पुन्हा एकदा नेत्रदीपक झेल; व्हिडीओ व्हायरल
- नागरिकांना लस मिळेपर्यंतच्या पूर्ण प्रक्रियेत मदत करा; पटोलेंचे काँग्रेस कार्यकर्त्यांना आवाहन
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

