नवी दिल्ली : देशभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने कहर माजवला आहे. देशात दररोज विक्रमी कोरोनाबाधितांची नोंद होत असून अयोग्य सेवेवर प्रचंड तणाव निर्माण झाला आहे. राज्यात देखील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे इतर राज्यांपेक्षा अधिक गंभीर परिणाम दिसून आले असून अनेक नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. अशातच, रुग्णालयात बेड्स, ऑक्सिजन, रेमडेसीवीर, अपुरी आरोग्य यंत्रणा, डॉक्टरांची कमतरता व इतर औषधांचा तुटवडा निर्माण झाल्याने रुग्णांच्या नातेवाईकांना मनस्ताप सहन करावा लागला असून व्यवस्थेविरोधात नागरिकांमध्ये चीड निर्माण होत आहे.
गेल्या 24 तासात देशात 4,01, 993 नव्या रुग्णांची भर पडली असून 3,523 रुग्णांना आपला जीव गमवावा लागला आहे. शुक्रवारी देशात जवळपास तीन लाख रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी गेले आहेत. त्या आधी गुरुवारी देशात 3.86 लाख रुग्णांची भर पडली होती. कोरोनाची रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. जगभरातील एकाच दिवशी वाढणाऱ्या रुग्ण संख्येपैकी 40 टक्के रुग्णसंख्या ही एकट्या भारतात वाढत असल्याचं समोर आलं आहे.
त्यामुळे आता अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडन यांचे प्रमुख आरोग्य सल्लागार असलेल्या डॉ. अँथॉनी फाऊची यांनी भारताला लॉकडाऊनची गरज असल्याचं म्हटलं आहे. भारतात काही दिवस लॉकडाऊन गरजेचा आहे. लॉकडाऊन केल्यास या कठीण काळात अत्यावश्यक पावलं उचलण्यास वेळ मिळेल, असं फाऊची यांनी म्हटलं. याशिवाय भारतानं लसीकणावरदेखील भर द्यायला हवा, असा सल्ला त्यांनी दिला आहे. डॉ. अँथॉनी फाऊची यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राला मुलाखत दिली त्यात त्यांनी हे वक्तव्य केले आहे. भारतातील परिस्थिती अतिशय गंभीर आहे. ती सुधारण्यासाठी तत्काळ काही पावलं उचलणं गरजेचं असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं.
महत्वाच्या बातम्या
- शिवभोजन थाळीने पार केला ४ कोटींचा टप्पा
- आरसीबीच्या प्रमुख शिलेदारांना बाद करत हरप्रित ब्रारने रचला ‘हा’ विक्रम
- ‘कोरोनाच्या संकटात सरकार मदत करू शकत नाही,मला आमदार असण्याची लाज वाटतेय’
- लता मंगेशकर यांचे एक पाऊल पुढे ; मुख्यमंत्री सहायता निधीला केली 7 लाखांची मदत
- पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिली अचानक शीसगंज साहेब गुरुद्वाराला भेट
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

