Share

शिवभोजन थाळीने पार केला ४ कोटींचा टप्पा

Published On: 

मुंबई : महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर सुरू झालेल्या शिवभोजन थाळीने चार कोटींचा टप्पा पार केला आहे. या माध्यमातून गरिबांना स्वस्तात अन्न उपलब्ध करुन देण्याची योजना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सुरू केली होती. वास्तविक युतीचा प्रचार करतांना शिवसेनेच्या वतीने शिवभोजनचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, राजकीय घडामोडीनंतर स्थापन झालेल्या महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात या योजनेची अंमलबजावणी सुरू झाली आहे.

या संदर्भात छगन भुजबळ यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून माहिती दिली. त्यांनी लिहिले की, ‘राज्यातील गोरगरीब, मजुर, शेतकरी, कामगार, विद्यार्थी कोणीही उपाशी राहू नये यासाठी सूरू करण्यात आलेल्या महाविकास आघाडी सरकारची महत्वकांक्षी योजना असलेली शिवभोजन थाळीने आज ४ कोटींचा टप्पा पार केला आहे. शिवभोजन थाळीच्या माध्यमातून ४ कोटी लोकांना आम्ही जेवण देऊ शकलो याचा मला आनंद आहे. संकटाच्या काळात शिवभोजन थाळी जनतेला मोठा आधार देत आहे….’

राज्य सरकारच्या वतीने ‘ब्रेक द चेन’च्या माध्यमातून लावण्यात आलेले कडक निर्बंध पाहता, शिवभोजन थाळी मोफत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्बंधात १५  दिवसांची वाढ केल्यानंतर आता शिवभोजन थाळीही पुढचे २ महिने मोफत देण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!