मुंबई : छोट्या पडद्यावरील ‘क्राईम पेट्रोल’, ‘सावधान इंडिया’ यासारख्या गुन्हेविषयक मालिकांमध्ये लहान भूमिका करत असललेल्या अभिनेत्रींनी चोरी केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी या दोघींना अटक केली आहे. सध्या कोरोनाचे संकट असल्यामुळे चित्रीकरणावर बंदी घालण्यात आली होती. त्यामुळे यांना आर्थिकअडचण निर्माण झाली होती. यासाठी यांनी हा मार्ग निवडला असल्याचे समोर येत आहे.
आरे कॉलनीतील ‘रॉयल पाम’ या उच्चभ्रू इमारतीत राहणाऱ्या एका व्यक्तीच्या घरात १८ मे रोजी त्या पेईंग गेस्ट म्हणून गेल्या होत्या. त्यानंतर त्यांनी त्या घरामध्ये आधीपासून पेईंग गेस्ट म्हणून राहत असलेल्या व्यक्तीच्या तिजोरीतून ३ लाख २८ हजार रुपये घेऊन त्या अभिनेत्रींनी पळ काढला.
यात आणखी एका पेईंग गेस्ट राहणाऱ्या व्यक्तीच्या पैशांची या महिलांनी चोरी केली. त्यानंतर त्या व्यक्तीने दोघींनी आपले पैसे चोरल्याचा संशय तक्रारदाराने पोलिसांकडे व्यक्त केला. पोलिसांनी सीसीटीव्ही फूटेज तपासल्यानंतर दोघीही इमारतीतून बाहेर पळून जाताना दिसल्या.
त्यानंतर पोलिसांनी दोघींना अटक केली आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही फूटेज दाखवल्यानंतर त्यांनी आपल्या गुन्ह्याची कबुली दिली असून पोलिसांनी दोघींना अटक केली आहे. या दोघांकडून ५० हजार रुपये पोलिसांनी जप्त केले आहेत. सध्या या दोघींना २३ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्याआधी कर्णधार विराटाचे मोठे वक्त्यव्य, म्हणाला…
- वैजापूरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या सभापतींसह, तीन संचालकांना ‘या’ कारणामुळे नोटीसा, राजकीय वर्तुळात खळबळ!
- सुपर न्यूमररी ते युवकांवरील गुन्हे; मराठा आरक्षणाच्या बैठकीनंतर राज्य सरकारची महत्वाची भूमिका !
- आदित्य ठाकरेंच्या पुढाकाराने मुंबई, पुणे, नागपूरसह औरंगाबादचा रेस टू झिरो मोहिमेत सहभाग!
- …जेव्हा गँगस्टर नातीला खेळवतो! अरुण गवळीचा फोटो होतोय व्हायरल


