Share

‘या’ राज्यात आढळला चक्क नदीत कोरोना विषाणू !

Published On: 

अहमदाबाद : कोरोना रोगाने गेल्यावर्षीपासून देशासह जगभरात थैमान घातला आहे. अनेक देश या रोगातून सावरत असून भारताला दुसऱ्या लाटेचा फटका बसला. कोरोनाची दुसरी लाट ही पहिल्याहून अधिक भयंकर होती. या लाटेचे सर्वाधिक परिणाम महाराष्ट्रात दिसून आले. दरम्यान, महाराष्ट्रासह इतर राज्यांमध्ये देखील कोरोना रुग्णांमध्ये घट होत असतानाच आता एक चिंता वाढवणारी माहिती समोर येत आहे.

वैज्ञानिक संशोधकांनी कोरोना विषाणूचा संसर्ग आल्यापासून विविध चाचण्या आणि त्यांचा अभ्यास करण्यावर भर दिला आहे. याच कारण म्हणजे सध्या जी जीवितहानी झाली, ज्या संकटातून सर्वच देशांना जावं लागलं ते संकट पुन्हा येऊ नये. काही दिवसांपूर्वी आयआयटी गांधीनगरकडून गुजरातमधील साबरमती नदीच्या पाण्याचे नमुने घेण्यात आले होते. चाचणीच्या निष्कर्षात तज्ज्ञांना पाण्यात कोरोना विषाणू असल्याचं लक्षात आलं. गुजरातची लाईफलाईन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या साबरमती नदीच्या पाण्यात कोरोना विषाणू आढळल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.

इतकचं नाही तर साबरमती नदीशिवाय अहमदाबादच्या कांकरिया आणि चंदोला या दोन तलावाच्या पाण्यातही कोरोना विषाणूचे अंश आढळून आले आहेत. आयआयटी गांधीनगरच्या पृथ्वी आणि विज्ञान विभागाचे प्राध्यापक मनीष कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, ३ सप्टेंबर ते २९ डिसेंबर २०२० पर्यंत प्रत्येक आठवड्यात पाण्याचे नमुने गोळा करण्यात आले होते. साबरमती नदीतून ६९४, कांकरिया तलावातून ५४९ तर चंदोला तलावातून ४०२ नमुने गोळा करण्यात आले होते. यातील २५ टक्के नमुन्यांत करोना विषाणू आढळून आला आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!