Share

धक्कादायक! माहिती तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद यांचे ट्विटर अकाऊंट ब्लॉक

Published On: 

नवी दिल्ली : केंद्र सरकार आणि ट्विटर यांच्यात वाद सुरू आहे. त्यातच नव्या नियमांबाबत ट्विटरने नाराजी व्यक्त करत त्यामुळे अभिव्यक्ती स्वातंत्र धोक्यात येत असल्याचे नमूद केले. त्यानंतर केंद्र सरकारनेही ट्विटरला फटकारत नियमांचे पालन करण्याचे निर्देश दिलेत. यानंतर ट्विटरने एक धक्कादायक प्रकार केल्याचे समोर आलेय.

माहिती तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद यांनी आपलं ट्विटर अकाऊंट एक तासासाठी ब्लॉक करण्यात आलं असल्याचा आरोप केला आहे. रवि शंकर प्रसाद यांनी ट्विटरवरुन यासंदर्भातील स्क्रीनशॉर्ट शेअर केले आहेत. “मित्रांनो आज माझ्यासोबत एक विचित्र गोष्ट घडली. ट्विटरने मला माझ्या अकाऊंटचा अ‍ॅक्सेस जवळजवळ तासभर दिला नव्हता. मी अमेरिकेतील डिजिटल मिलेनियम कॉपीराइट कायद्याचं उल्लंघन केल्याचं मला सांगण्यात आलं आणि नंतर मात्र मला त्यांनी अ‍ॅक्सेस दिला,” असं पहिल्या ट्विटमध्ये रवि शंकर प्रसाद यांनी म्हटलं आहे.

ते म्हणाले की, ट्विटरच्या या कृतीने माहिती तंत्रज्ञान 2020 च्या नियम 4 चे उल्लंघन केले आहे. कोणतीही पूर्वसूचना न देता अकाऊंट ब्लॉक करण्यात आले आहे. कोणत्याही प्लॅटफॉर्मला आयटीसंदर्भात नवीन कायदा पाळावाच लागेल. यावर कोणतीही तडजोड केली जाणार नाही. ट्विटरच्या या कृतीतून हे स्पष्ट झाले आहे की ते बोलण्याच्या स्वातंत्र्याच्या बाजूने नाही, तर त्यांचा अजेंडा चालवण्यातच त्यांना रस आहे असे रविशंकर म्हणाले.

तिसऱ्या ट्विटमध्ये रवी शंकर प्रसाद यांनी, “ट्विटरचा (नवीन नियमांसंदर्भातील) उच्च उदासीनपणा आणि अनियंत्रित कृतीविरोधात आवाज उठवणारी माझी विधाने, विशेषत: टीव्ही वाहिन्यांना दिलेल्या माझ्या मुलाखतीच्या क्लिप्स मी शेअर केल्याने आणि त्याचे परिणामकारक प्रभाव दिसून आल्याने या गोष्टी घटल्याचं स्पष्टपणे दिसत आहे,” असं म्हटलं आहे.

देशातील कायदे पाळा
केंद्र सरकारने जाहीर केलेल्या सोशल मीडिया कंपन्यांसाठीच्या नियमावलीवरून केंद्रीय माहिती व तंत्रज्ञानमंत्री रविशंकर प्रसाद यांनी नुकतेच सोशल मीडिया कंपन्यांना खडेबोल सुनावले होते. ‘या कंपन्यांनी भारताला लोकशाही आणि स्वातंत्र्याचे धडे देऊ नये. देशात राहून नफा कमवायचा असेल तर संविधान आणि कायदे पाळावेच लागतील’, असा सज्जड दमदेखील या कंपन्यांना भरला होता. ‘सोशल मीडिया कंपन्या येथे पैसे कमवितात त्याबद्दल काहीच अडचण नाही. त्यांनी पंतप्रधानांवर टीका करावी, माझ्यावर टीका करावी, प्रश्नदेखील विचारावेत, पण देशातील कायदे पाळावेत, असा इशारा त्यांनी यावेळी दिला.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!