🕒 1 min read
मुंबई : ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण घालवणाऱ्या आघाडी सरकारच्या नाकर्त्या कारभारा विरोधात भारतीय जनता पार्टीतर्फे २६ जून रोजी राज्यात एक हजार ठिकाणी चक्का जाम आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी दिली.
या आंदोलनाच्या अनुषंगाने पंकजा मुंडे यांनी कार्यकर्त्यांना साद घातली आहे. ‘उद्या सकाळी 9:30वाजता छत्रपती शाहू महाराजांचे पूजन,10 वाजता चक्का जाम ची सुरुवात करायची आहे. मी पुणे आणि पिंपरी चिंचवड येथे स्वतः सहभागी होणार, मुंडे साहेब जरी नसतील तरी त्यांचा आवाज तुमच्यापर्यंत पोचत आहे..obc हक्काचा आवाज जणू वादळात वीज कडाडते असा झाला पाहिजे..होणार ना??’ असे ट्विट पंकजा मुंडे यांनी केलेय.
उद्या सकाळी 9:30वाजता छत्रपती शाहू महाराजांचे पूजन,10 वाजता चक्का जाम ची सुरुवात करायची आहे.मी पुणे आणि पिंपरी चिंचवड येथे स्वतः सहभागी होणार,मुंडे साहेब जरी नसतील तरी त्यांचा आवाज तुमच्यापर्यंत पोचत आहे..obc हक्काचा आवाज जणू वादळात वीज कडाडते असा झाला पाहिजे..होणार ना??
— Pankaja Gopinath Munde (@Pankajamunde) June 25, 2021
तर ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण कायम राहिले असते
पंकजा मुंडे यांनी सांगितले की, नाकर्त्या राज्य सरकारने ठोस पाऊल उचलले असते, तर ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण गमाविण्याची वेळच आली नसती. फडणवीस सरकारने तातडीने हालचाली केल्यामुळेच त्यावेळी हे आरक्षण वाचले. मात्र त्यानंतर आघाडी सरकारने आवश्यक ती कायदेशीर कार्यवाही वेळेत पूर्ण केली नाही. आघाडी सरकारमधील मंत्री आरक्षणाच्या मुद्द्याचा निकाल लागेपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ देणार नाही अशी वक्तव्ये करतात. मात्र राज्य निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जाहीर केल्या तरी आघाडी सरकारमधील मंत्री गप्प आहेत.
राज्य सरकारच्या निष्क्रियतेमुळेच निवडणुका जाहीर
सुप्रीम कोर्टाचा निकाल येऊन दोन महिने लोटले तरी सरकारने ओबीसी समाजाला राजकीय आरक्षण परत मिळवून देण्यासाठी काही हालचाली केल्या नाहीत. राज्य सरकारच्या निष्क्रियतेमुळेच राज्य निवडणूक आयोगाकडून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर करण्यात आल्या. आघाडी सरकारचे मंत्री निवडणुका होऊ देणार नाहीत , असे फक्त म्हणत राहिले. आता आम्ही यासाठी 26 जूनला राज्यभर 1 हजार ठिकाणी रस्त्यावर उतरुन आंदोलन करणार आहोत. पक्षाचे सर्व पदाधिकारी, लोकप्रतिनिधी या आंदोलनात सहभागी होणार आहेत, असेही पंकजा मुंडे यांनी नमूद केले.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘होय, मी गुन्हा केलाय..’, सुप्रीम कोर्टातील कथित ऑक्सिजन रिपोर्टवर केजरीवालांचा खुलासा
- ‘अस्तित्वात नसलेल्या अहवालावरून भाजपच्या केजरीवालांना विनाकारण शिव्या’
- ‘फटाके फुटायला सुरुवात झालीये, लिस्ट बरीच मोठी आहे!’
- ‘कलम ३७० आमची ओळख, त्यासाठी सदैव लढा देणार’ मेहबूबा मुफ्तींची प्रतिक्रिया
- डेल्टा प्लस व्हेरियंट संदर्भात राहुल गांधींनी मोदी सरकारला विचारले ‘हे’ प्रश्न
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
