खुलताबाद : खुलताबाद नगर परिषदेचा सफाई कामगार रामू जम्मन तुपे (वय ५८,रा. राजीव गांधी नगर खुलताबाद) यांनी तीन दिवसांपूर्वी कोविड-१९ ची लस घेतली होती. पण त्यानंतर तीन दिवस त्यांना प्रचंड ताप आला. आणि गुरुवारी एक दुपारी ११ ते १२ वाजेच्या सुमारास त्यांचे अचानक निधन झाले. या वृत्तामुळे खुलताबादेत लसीकरणाविषयी एक च खळबळ उडाली आहे.
कोरोना लसीकरणामुळे मृत्यू झाल्याचा संशय त्यांच्या नातेवाईकांनी व्यक्त केला आहे. दरम्यान त्यांचा मृतदेह सार्वजनिक रुग्णालयात पाठविण्यात आला असून मृत्यूचे नेमके कारण समजण्यासाठी पोलीस पंचनामा करून मृतदेहाची उत्तरीय तपासणी केली जाणार आहे.
खुलताबाद येथे सार्वजनिक रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अमर सिंह यांनी सांगितले की, दुपारच्या सुमारास राजू जम्मन तुपे यांचा मृतदेह रुग्णालयात आणण्यात आला. त्यांनी १५ मार्च रोजी कोरोना लसीचा पहिला डोस घेतला असून त्यांना दोन-तीन दिवसांपासून ताप येत होता. असे नातेवाईकांनी सांगितले.
लसीकरण झाल्यानंतरच व्यक्तीचा मृत्यू झाल्याची वैद्यकीय तपासणी करून शवविच्छेदन करणे अत्यंत गरजेचे असते. मात्र ही सुविधा खुलताबाद येथील रुग्णालयात उपलब्ध नसल्याने औरंगाबाद येथील शासकीय रुग्णालयात विशेष वैद्यकीय पथकाकडून पोस्टमार्टेम करण्यात येईल.
व त्या डॉक्टरांनी दिलेल्या वैद्यकीय अहवालानुसार सदरील व्यक्ती कोणत्या कारणामुळे मृत झाला हे स्पष्ट होईल. त्यामुळे आता अहवालाची प्रतीक्षा असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. मयत तुपे यांच्या मागे पत्नी, तीन मुली व दोन अपंग मुले असून त्यांची कौटुंबिक परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- हॉस्पीटलची तोडफोड, दोघांना सहा महिन्याची शिक्षा
- पुणे महानगरपालिकेकडून फुले दाम्पत्यास मरणोत्तर भारतरत्न द्यावा म्हणून ठराव मंजूर
- पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकण्याची हिंमत कुठून आली ? सूर्यकुमारनं सांगितलं गुपित !
- तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या
- सावधान! औरंगाबादेत खाटांपेक्षा जास्त रुग्णसंख्या
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

