औरंंगाबाद : जटवाडा रस्त्यावरील अंबरहिल भागातील देहाडेनगर येथील रहिवासी विशाल भास्कर जिलहमेवाड (वय १९) या युवकाने गळफास घेवून आत्महत्या केली. ही घटना गुरूवारी उघडकीस आली. आत्महत्येचे कारण समजले नसल्याचे पोलिसांनी सांगितले.
विशाल जिलहमेवाड याने छताच्या लाकडी बल्लीला कपड्याच्या सहाय्याने बांधुन गळफास घेतला होता. हा प्रकार त्याच्या कुटुंबियाच्या लक्षात आल्यावर त्यांनी जिलहमेवाड याला उपचारासाठी घाटीत दाखल केले.
डॉक्टरांनी तपासून मयत घोषीत केले. याप्रकरणी हर्सूल पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून विशाल जिलहमेवाड याने आत्महत्या का केली याचे कारण समजू न शकल्याचे पोलिसांनी सांगितले.
महत्वाच्या बातम्या
- जबरदस्तीने वीजबिल वासून कराल तर आम्ही कायदा हातात घेवू; राजू शेट्टींचा आक्रमक इशारा
- योगीजींच्या नेतृत्वात उत्तर प्रदेश निरंतर प्रगतीपथावर राहून ‘सर्वोत्तम प्रदेश’ बनावा – नाईक
- मुंबईत आज पासूनच कडक निर्बंध लागू होऊ शकतात – महापौर किशोरी पेडणेकर
- सचिन वाझे आणि हिरेन यांचे ‘ते’ सीसीटीव्ही फुटेज आले समोर
- कर्नाटकने महाराष्ट्रातून येणाऱ्या बसेसना बंदी घातली
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

