🕒 1 min read
औरंगाबाद : औरंगाबादेत कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. दररोज एक हजार ते बाराशे नवीन कोरोना रुग्ण वाढत असल्यामुळे आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण येत आहे. उपलब्ध बेड्सच्या तुलनेत रुग्णसंख्या अधिक असल्यामुळे अनेक कोरोनाबाधित रुग्णांना बेडच मिळत नसल्यामुळे उपचारासाठीही विलंब होत आहे. गरिबांची आधार अशी ओळख असलेल्या घाटी रुग्णालयातही हीच अवस्था आहे. सक्रीय रुग्णांची एकूण ८५७० एवढी आहे तर उपलब्ध बेड्सची संख्या ६२२८ आहे. बेड्सच्या क्षमतेपेक्षा २३४२ अधिक रुग्णसंख्या असल्याने परिस्थिती बिकट झाली आहे.
वाढत्या रुग्ण संख्यमुळे आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण येत आहे. क्षमतेपेक्षा अधिक रुग्णांवर उपचार करता करता आरोग्य यंत्रणेची दमछाक होऊ लागली आहे. एवढ्या रुग्णसंख्येवर उपचार करताना औषधी आणि मनुष्यबळ दोन्हीही अपुरे पडत आहेत. रुग्णसंख्येचा वाढता जोर ओसरला नाही तर ही परिस्थिती आणखीच बिकट होण्याची शक्यता आहे.
कोविड केअर सेंटर आणि रुग्णालयातील अपुर्या बेड्सची संख्या यावर तोडगा म्हणून कोरोनाची सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांना होम आयसोलेशन म्हणजेच घरीच उपचार घेण्याची परवानगी देण्यात आली आहे. गुरूवारपर्यंत दीड हजारांवर रुग्णांना घरीच उपचार घेण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे औरंगाबादकरांनी आता तरी बेफिकीरी आणि बेजबाबदारपणा सोडून स्वतःची काळजी घेणे, मास्क वापरणे, गर्दी टाळणे आणि वारंवार हात धुणे हाच सध्या तरी कोरोना महामारीपासून स्वतःचा बचाव करण्याचा सगळ्यात सोपा आणि सुरक्षित मार्ग आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘नो मास्क नो लाइफ’, पालकमंत्र्यांनी दिल्या ‘या’ सुचना
- ‘हे माझं चुकलं का ?’ अंतर्गत कलहाला कंटाळल्याने भाजप नगरसेवकाची पोस्टरबाजी
- टीम इंडियासाठी खुशखबर; अखेरच्या सामन्यासाठी ट्वेंटी-20 स्पेशालिस्ट गोलंदाज परतला
- खळबळजनक! प्रेयसीच्या घरात शिवसेना पदाधिकाऱ्याची आत्महत्या
- औरंगाबाद शहरात येताय? सावधान! शहराच्या ‘या’ प्रवेशद्वारांवर होणार कोरोना चाचण्या
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
