औरंंगाबाद : हॉस्पीटल समोर उभी केलेली दुचाकी चोरीला गेल्याने हॉस्पीटलमधील सामानाची तोडफोडकरुन कंम्पाउंडरला जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणात अमोल सुरेश उर्फ सुर्यभान धिवर (वय २०) आणि रामेश्वर भगवान मिसाळ (वय २८, दोघे रा. विजयनगर, वाळूज) या दोघांना सहा महिन्यांची कैद आणि विविध कलमांखाली प्रत्येकी पाच हजारांचा दंडाची शिक्षा प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी रुहिना अंजूम यांनी ठोठाविली.
या प्रकरणात वाळूज येथील नेहा हॉस्पीटलचा कंम्पाउंडर संतोष कडुबा गांगुर्डे (वय ३५) यांनी फिर्याद दिली होती. त्यानूसार, ३ सप्टेंबर २०१८ रोजी सकाळी साडेनऊ ते दहा वाजेच्या सुमारास वरील दोन्ही आरोपी हॉस्पीटलमध्ये शिरले आणि त्यांनी हॉस्पीटल समोर उभी केलेली दुचाकी चोरुन नेल्याचा आरोप करित हॉस्पीटलमधील एलसीडी टिव्ही, फर्निचरची मोडतोडकरुन हॉस्पीटलचे सुमारे ९० हजारांचे नुकसान केले.
तसेच गांगेर्डे यांना जीवे मारण्याची धमकी दिली. प्रकरणात वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास अधिकारी तत्कालीन जमादार के.टी. महाजन यांनी तपास करुन आरोपींविरोधात दोषारोपपत्र दाखल केले. सुनावणीवेळी सहायक सरकारी वकील सूर्यकांत सोनटक्के यांनी नऊ साक्षीदारांचे जबाब महत्वपूर्ण ठरले.
महत्वाच्या बातम्या
- जबरदस्तीने वीजबिल वासून कराल तर आम्ही कायदा हातात घेवू; राजू शेट्टींचा आक्रमक इशारा
- योगीजींच्या नेतृत्वात उत्तर प्रदेश निरंतर प्रगतीपथावर राहून ‘सर्वोत्तम प्रदेश’ बनावा – नाईक
- मुंबईत आज पासूनच कडक निर्बंध लागू होऊ शकतात – महापौर किशोरी पेडणेकर
- सचिन वाझे आणि हिरेन यांचे ‘ते’ सीसीटीव्ही फुटेज आले समोर
- कर्नाटकने महाराष्ट्रातून येणाऱ्या बसेसना बंदी घातली
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

