Share

पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकण्याची हिंमत कुठून आली ? सूर्यकुमारनं सांगितलं गुपित !

Published On: 

🕒 1 min read

अहमदाबाद : इंग्लंडविरुद्धच्या टी-२० मालिकेतील चौथ्या आणि निर्णायक सामन्यात भारताने ८ धावांनी विजय मिळवत मालिकेतील आपले आव्हान कायम ठेवले आहे. १८५ धावांचा पाठलाग करताना इंग्लंडच्या संघाला भारतीय गोलंदाजानी १७७ धावांत रोखले. या विजयामुळे भारताने ५ सामन्याच्या टी-२० मालिकेत २-२ अशी बरोबरी केली आहे.

दरम्यान, या महत्वपूर्ण सामन्यात हिटमॅन रोहित शर्मा बाद झाल्यानंतर आंतरराष्ट्रीय क्षेत्रात भारतासाठी फलंदाजी करण्यास सूर्यकुमार यादव पहिल्यांदाच मैदानावर उतरला होता. यावेळी जोफ्रा आर्चर गोलंदाजी करत होता. सूर्यकुमारने पहिल्याच चेंडूवर अफलातून षटकार मारला. त्याने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीची सुरुवात षटकाराने केली, एवढंच नाही तर त्याने अत्यंत गरजेची अर्धशतकी खेळी देखील केली.

सूर्यकुमार ३१ चेंडूंमध्ये ५६ धावा केल्यानेच भारताला आव्हानात्मक धावा रचता आल्या होत्या. दरम्यान, पहिल्याच चेंडूवर जोफ्रा आर्चरसारख्या गोलंदाजाला सिक्स मारण्याची हिमंत कुठून आली, असा प्रश्न शार्दुल ठाकूरने सूर्याला विचारला. यावर सूर्यकुमार यादवने उत्तर दिलं आहे.

‘मी जोफ्रा आर्चरला आंतरराष्ट्रीय आणि आयपीएल क्रिकेटमध्ये अनेकदा पाहिलं आहे. तो नवख्या फलंदाजांना बॅकफुटवर ठेवण्याचा प्रयत्न करतो. मी आयपीएलमध्ये त्याच्या विरोधात गेल्या 3 वर्षांपासून खेळतोय. त्यामुळे मला कल्पना आली आहे. मी हा फटका माझ्या क्रिकेट कारकिर्दीच्या सुरुवातीपासून खेळत आलो आहे. लोकल, प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये मी असे फटके मारले आहेत. आम्ही सुरुवातीला रबर आणि टेनिस बोलने सिमेंटच्या पीचवर क्रिकेट खेळायचो. तेव्हापासून मी हा शॉट अवगत केला आहे,’ असं सविस्तर उत्तर सूर्यकुमारने दिलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!