Share

धक्कादायक! बीडमध्ये कोरोना रुग्णाची रुग्णालयातच आत्महत्या

Published On: 

बीड : कोरोना बाधीत रुग्णाने गळ्यातील रुमालाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज शुक्रवारी पहाटे बीड शहरातील दिप हॉस्पिटलमध्ये घडली. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी बीड शहर पोलीस ठाण्याचे पीआय रवी सानप यांच्यासह पोलीसांनी धाव घेत घटनेचा पंचनामा केला. नातेवाईकांनी शवविच्छेदन करण्याची मागणी पोलीस अधीक्षकांकडे केली आहे.

मिळालेल्या माहितीनूसार, शहरातील दिप हॉस्पिटलमध्ये रामलिंग महादेव सानप (वय ३५ वर्षे, रा. तांदळ्याची वाडी) हे कोरोनावर उपचार घेत होते. शुक्रवारी पहाटे त्यांनी हॉस्पिटलमधील तिसर्‍या मजल्यावर स्वत:जवळील रुमालाने गळफास घेऊन आत्महत्या केली. घटनेची माहिती शहर पोलीस ठाण्याच्या पोलीसांना होताच घटनास्थळी पीआय रवि सानप, एपीआय अंतरप, एएसआय बब्रुवान गांधले यांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेऊन पंचनामा केला.

नातेवाईकांनी शवविच्छेदनाची मागणी केल्यानंतर मृतदेह जिल्हा रुग्णालयातील पीएम रुममध्ये दुपारी एक वाजेपर्यंत होता. पीएम झाले नसल्याने नातेवाईकांनी पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन पीएम करण्याची मागणी केली. दरम्यान, ही आत्महत्या का केली याची उशिरापर्यंत माहिती मिळाली नव्हती. तर दुसरीकडे रुग्णालयात आत्महत्या झाल्याने तेथील सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. पोलिसांनी सर्व बाजुंनी चौकशी करावी अशी मागणी होतेय.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!