🕒 1 min read
नवी दिल्ली : एका प्रकरणावरून सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला फटकारले आहे. इटालियन नौदल सैनिकांच्या हल्ल्यात भारतीय मच्छिमारांचा मृत्यू झाला होता. पण त्यांच्या कुटुंबीयांना १० कोटींची नुकसान भरपाई मिळण्यात विलंब होत आहे. यावर सुप्रिम कोर्टाने नाराजी व्यक्त केली आहे. केंद्र सरकारकडून वेगाने कारवाई सुरू असल्याचे सांगण्यात आलंय, तरीही तुमच्या कामाचा वेग आम्हाला माहीत आहे, अशा शब्दांत कोर्टाने सरकारच्या कामकाजावर ताशेरे ओढले.
अधिक असे की, केरळच्या समुद्रात फेब्रवारी २०१२ साली इटलीच्या नौदल जवानांच्या हल्ल्यात दोन भारतीय मच्छिमार ठार झाले होते. याप्रकरणी इटली सरकारकडून मृत मच्छिमारांच्या कुटुंबीयांना १० कोटी रुपये नुकसान भरपाई देण्यात येणार आहे. ही भरपाई घेऊन प्रकरण मिटवण्यास पीडित कुटुंबियांनी सहमती दर्शवली होती. त्यामुळे हे प्रकरण बंद करण्यात यावे, अशी विनंती केंद्र सरकारकडून न्यायालयात करण्यात आली होती.
केंद्राच्या या विनंतीवर सुनावणी करताना सरन्यायाधीश एस. ए. बोबडे यांच्या खंडपीठाने नुकसान भरपाईची रक्कम जमा झाली आहे का, अशी विचारणी केली. यावर केंद्र सरकारने पैसे पाठवण्याची प्रक्रिया सुरू झाल्याचे सांगितले. इटलीकडून पैसे पाठवण्यात आले असून ते मिळताच न्यायालयाच्या आदेशानुसार ते कोर्टात जमा करण्यात येतील, असे सरकारी वकिलांनी सांगितले. यावर न्यायालयाने विलंबाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. केंद्र सरकार आधी तातडीने सुनावणी घेण्यासाठी आग्रही होते. गेल्या सुनावणीवेळी तुम्ही सांगितले होते की, पैसे तीन दिवसांत जमा होतील. तुम्ही किती वेगाने काम करता हे आम्हाला चांगलेच माहीत आहे, असे खंडपीठाने ठणकावले.
महत्त्वाच्या बातम्या
- संसदेचे आपत्कालीन अधिवेशन बोलवा, काँग्रेसची राष्ट्रपतींकडे मागणी
- ‘बाअदब बामुलायजा होशियार ! उमर ४५ नहीं तो क्या हुआ आखिर वो फडण २० है
- होनी को अनहोनी करणाऱ्या धोनीची डाईव्ह ; ४०व्या वर्षी ही दाखवला फिटनेस
- ‘रेमडेसिवीर मॅजिक बुलेट नाही, त्याने मृत्यू होणार नाहीत असही नाही, खरं तर…’
- रेमडेसिविरची साठेबाजी करणाऱ्यांची एनआयए-ईडी मार्फत चौकशी करा; चव्हाणांची मागणी !


